भारत आणि इस्रायलच्या मैत्रीपूर्ण संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुंबईतल्या हॉटेल ताजमध्ये ‘शालोम बॉलीवूड’ या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांच्यासह निर्माते सुभाष घई, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, श्वेता नंदा राय, दिग्दर्शक करण जोहर, ज्येष्ठ अभिनेता रणधीर कपूर, दिग्दर्शक इम्तियाज अली, मधुर भांडारकर, अभिषेक कपूर, सारा अली खान, विवेक ओबेरॉय असे बॉलिवूडमधले अनेक तारे- तारकादेखील उपस्थित होते. यावेळी बेन्यामिन नेत्यानाहू यांनी बॉलिवूडचं कौतुक केलं पण त्याचबरोबर बिग बी अमिताभ बच्चन त्यांचं बॉलिवूडमधलं कार्य पाहून तेही भारावून गेले. ‘माझ्या फॉलोअर्सपेक्षाही अमिताभ बच्चन यांचे फॉलोअर्स हे सर्वाधिक आहेत. तीन कोटींहून अधिक लोक त्यांना फॉलो करतात हे पाहून मी निशब्द झालो. ‘, अशा शब्दात त्यांनी अमिताभ बच्चन यांचं कौतुक केलं.

‘बिग बॉस ११’तून सलमानने कमावले *** कोटी रुपये

प्रियांकाच्या ‘त्या’ व्हायरल फोटोंमागचे सत्य

‘भारताच्या विकासात बॉलीवूड उद्योगाचा मोठा वाटा आहे. जगात बॉलीवूडचा दबदबा आहे. मीही भारतीय चित्रपट आणि कलाकारांचा चाहता आहे. बॉलीवूड, भारतीय चित्रपट सृष्टीतली कल्पकता, सर्जनशीलता आणि इस्रायलमधील चित्रिकरणासाठी उत्कृष्ठ ठरतील अशी पर्यटनस्थळे, प्रगत तंत्रज्ञानाचा मेळ पडल्यास मनोरंजन विश्वात नक्कीच चमत्कार होईल. त्यामुळे बॉलीवूडमधल्या कलाकारांचे इस्रायलमध्ये स्वागत आहे’, असेही नेत्यानाहू यांनी या कार्यक्रमात सांगितले. इतकंच नाही तर नेत्यानाहू यांनी बॉलीवूडला इस्रायलमध्ये येण्याचंही आमंत्रण दिले. या कार्यक्रमात अमिताभ बच्चन आणि बॉलिवूडमधल्या इतर कलाकारांनी बेन्यामिन नेत्यानाहू यांच्यासोबत सेल्फीदेखील घेतला.