बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर एकदा तरी काम करण्याची संधी मिळावी, अशी बॉलिवूडमधील अनेकांची प्रबळ इच्छा असते. असे असले तरी, प्रत्यक्षात जेव्हा अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळते, तेव्हा या कलाकारांना प्रथम कमालीचे दडपण येते. परंतु, सेटवरील अमिताभ बच्चन यांच्या सहससुलभ वागण्याने त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो. कालांतराने या महानायकाबरोबर काम करणे त्यांना सोपे वाटू लागते. ‘वझिर’ या आगामी चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करीत असलेल्या फरहान अख्तरलासुद्धा असाच अनुभव आला. याविषया तो म्हणतो, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करणे खूपच सोपे होते. त्यांचे व्यक्तिमत्व सकारात्मक असून, सेटवरील सह-कलाकाराबरोबरच्या त्यांच्या सहससुलभ वागण्याने तणाव नाहिसा होतो. त्यांच्याबरोबरचा सेटवरील माझा पहिला दिवस कसा असेल हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक होतो. परंतु, त्यांच्याबरोबर काम करणे अतिशय सोपे आहे. सेटवर पोहोचल्यावर ज्या क्षणी तुम्ही त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात करता, तुमच्या मनावरील दडपण नाहीसे होते. त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव आश्चर्यकारक असल्याची भावना फरहानने वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केली.
विधू विनोद चोप्रा यांची निर्मिती असलेला आणि बिजॉय नंबियार यांचे दिग्दर्शिन असलेल्या ‘वझिर’ चित्रपटात अमिताभ बच्चन पक्षाघात झालेल्या ज्येष्ठ बुध्दिबळपटूची भूमिका साकारत असून, फरहान ‘एटीएस’ अधिकाऱ्याची भूमिकेत दिसणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Dec 2014 रोजी प्रकाशित
अमिताभ बच्चनबरोबर काम करणे सोपे – फरहान अख्तर
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर एकदा तरी काम करण्याची संधी मिळावी, अशी बॉलिवूडमधील अनेकांची प्रबळ इच्छा असते. असे असले तरी, प्रत्यक्षात जेव्हा अमिताभ बच्चन...

First published on: 01-12-2014 at 05:35 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Its easy to work with amitabh bachchan farhan akhtar