तो विरुद्ध ती. कोणाची महत्त्वाकांक्षा मोठी? तिच्यासाठी निवड करणे जास्त सोपे आहे का? तिचे अफेअर त्याच्या मनमानीपेक्षा वाईट आहे का? तिचे सत्य त्याच्या वास्तवाहून जटील आहे का? घटस्फोटित आणि त्यातून बाहेर येण्याचा निश्चय केलेल्या मीरा वर्माचे सर्व काही पणाला लागले आहे- तिचे करिअर, तिचे प्रेम, तिची ओळख! स्त्री आणि पुरुष यांना वेगवेगळ्या पद्धतीने जोखले जाते अशा जगात स्वत:च्या हक्काच्या स्थानासाठी झगडणाऱ्या मीराची गोष्ट वूट ओरिजिनल- इट्स नॉट द सिम्पल उत्तर देते एका युगानुयुगे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे- स्त्री किंवा पुरुष असण्याने फरक पडतो का? आयुष्याच्या सर्व क्षेत्रांतील नव्या युगाच्या स्त्रियांना प्रेरणा देणाऱ्या या शोचे महत्त्व वाढले आहे स्वरा भास्कर, सुमीत व्यास, पूरब कोहली, विवान भटेना आणि करणवीर मेहरा या कलाकारांमुळे.

एक स्त्री, एक आई, एक व्यावसायिक… एका मित्रासमोर, साथीदारासमोर, प्रियकरासमोर संघर्षाच्या पावित्र्यात उभ्या असलेल्या मीराचा प्रवास म्हणजे व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यांची एक जटील सरमिसळ आहे. तिला व्यावसायिक आयुष्यात नवीन शिखरे पादाक्रांत करण्याची इच्छा आहे पण यात दोन्ही आयुष्यांच्या सीमारेषा धूसर होत जातात आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही ती अखेर ठराविक साच्यांच्या सापळ्यात अडकत जाते. या नव्या वेब सीरिजबाबत, वूटच्या कंटेट प्रमुख मोनिका शेरगिल म्हणाल्या, “सध्याच्या काळाचा संदर्भ सांगणारी ही मालिका आहे. यात एक प्रभावी स्त्री व्यक्तिरेखा आणि चार पुरुष व्यक्तिरेखा असून त्यामार्फत स्त्री-पुरुष संघर्ष मांडला जाणार आहे. या सर्वच व्यक्तिरेखांमध्ये कोणीच पूर्णपणे योग्य किंवा पूर्णपणे अयोग्य नाही आणि या स्त्री-पुरुष वादातील उत्तरे प्रश्नांइतकीच जटील आहेत.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Rupee hits all time low against US Dollar
रुपयाची विक्रमी नीचांकापर्यंत घसरण; रिझर्व्ह बँकेचा डॉलर विक्रीद्वारे हस्तक्षेप अयशस्वी 
Vasai, Fake Doctor, Wrong Surgery, Leads to Death, woman, Social Activist, marathi news, maharashtra,
वसई : बोगस डॉक्टरने घेतला महिलेचा बळी; चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे महिला ४ वर्षे अंथरूणात
Newspaper hack
Kitchen Hack : फ्रिजमध्ये ठेवा रद्दी वृत्तपत्र अन् पाहा काय होईल कमाल, Viral Video येथे बघा

मीरा वर्माची व्यक्तिरेखा साकारणारी स्वरा भास्कर आपल्या या नवीन भूमिकेबाबत म्हणते, “तिच्यात बऱ्या-वाईटाचे मिश्रण आहे, तिच्यात दोषही आहेत आणि या सर्वांहून अधिक म्हणजे ती खरी आहे. एक काम करणारी स्त्री व एकटीने पालकत्व निभावणारी आई साकारण्याचा अनुभव मजेशीर होता. या बाईचे प्राधान्यक्रम स्पष्ट आहेत- प्रेम आणि नाती तुमच्यासाठी थांबून राहू शकतात, पैसा थांबत नाही. स्त्री-पुरुष समानतेवर विश्वास असलेल्या अनेक स्त्रियांना आणि पुरुषांनाही माझी भूमिका आवडेल.” या शोचा एक भाग असल्याबद्दल सुमीत व्यास म्हणाला, “हा शो काळाच्या पुढचा आहे आणि त्याचा भाग असण्याची भावना माझ्यासाठी सन्मानाची तसेच रोमांचक आहे. माझ्या व्यक्तिरेखेत- देवमध्ये काळ्या आणि करड्या छटा आहेत. तो महत्त्वाकांक्षेने पेटलेला आहे, हवे ते मिळवणारा आहे पण त्याची जोडीदार मीरा समोर येते तेव्हा तो भावनांना बळीही पडू शकतो; बऱ्याच हलक्याफुलक्या व्यक्तिरेखा केल्यानंतर देव साकारणे जेवढे आव्हानात्मक तेवढेच रोमांचकही होते.” व्हिक्टर टँगो एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडची निर्मिती व दानीश अस्लम यांचे दिग्दर्शन असलेली ही मालिका वूटवर १४ डिसेंबर पासून सुरु झाली आहे.