News Flash

.. म्हणून गर्दीतही स्वत:ला एकटा समजतो किंग खान

मला संकोचलेपणा वाटतो

शाहरुख खान

बॉलिवूड, प्रसिद्धी, चाहते, यश हे शब्द एकमेकांशी निगडीतच आहेत. बॉलिवूडमध्ये हे समीकरण तसं पाहायला गेलं तर बऱ्याच कलाकारांच्या वाटणीला येतं. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे शाहरुख खान. बॉलिवूडमध्ये २५ वर्षांची यशस्वी कारकीर्द करुन आणि चाहत्यांचे प्रेम मिळवूनही किंग खान मात्र स्वत:ला या गर्दीत एकटाच समजतो. किंग खान सध्या चर्चेत आहे तो म्हणजे त्याच्या आगामी चित्रपट ‘डिअर जिंदगी’मुळे.

या चित्रपटामध्ये शाहरुख मानसोपचार तज्ज्ञाची भूमिका साकारत आहे. पण त्याच्या नेहमीच्या जीवनात मात्र तो कधीच स्वत:च्या खासगी बाबींविषयी कोणासमोरही सहसा व्यक्त होत नाही, कोणाचे सल्लेही मागत नाही. ‘मी खुपच गुढ आहे. माझ्या स्वत:भोवतीच एक प्रकारचे आवरण आहे. माझ्या खासगी आणि भावनिक गोष्टींविषयी इतरांशी बोलताना मला संकोचलेपणा वाटतो. तसं पाहिलं तर माझा मित्र जरी माझ्याशी त्याच्या व्यक्तिगत आणि खासगी जीवनाविषयी बोलत असेल तरीही मला संकोचलेपणा वाटतो’, असे शाहरुख एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला. ‘कोणीही ज्यावेळी त्यांच्या वैय्यक्तिक आणि खासगी विषयांविषयी माझ्यासोबत बोलायला येतं त्यावेळी कसे वागायचे हेच मला कळत नाही’, असेही त्याने स्पष्ट केले.

‘असे नाही की खासगी गोष्टींविषयी बोलताना मी जास्तच संकोचतो. पण, हे ही तितकेच खरे की काही गोष्टी मी स्वत:पुरताच सीमीत ठेवतो’ असेही शाहरुख म्हणाला. त्यामुळे किंग खानच्या या वक्तव्यामुळे प्रसिद्धी आणि चाहत्यांच्या गर्दीतही तो स्वत:ला एकटाच समजतो असेच म्हणावे लागेल. दरम्यान, अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटामध्ये प्रथमच आलिया भट्टसोबत स्क्रिन शेअर करत आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख आणि आलिया व्यतिरिक्त अभिनेता कुणाल कपूरही एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. गौरी शिंदे दिग्दर्शित हा बहुप्रतिक्षित चित्रपट २५ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

वाचा: मी माझ्या मुलांना लैंगिक शिक्षण देऊ शकत नाही- शाहरुख खान

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 1:17 am

Web Title: ive no outlet for venting my personal issues shah rukh khan
Next Stories
1 हृतिकसोबत ‘या’ चित्रपटात झळकणार त्याचा बॉडीगार्ड?
2 अरबाज खानचे नवे ‘अफेअर’
3 ‘ऐ जिंदगी गले लगा ले..’
Just Now!
X