24 September 2020

News Flash

.. जेव्हा जॅकी भगनानी ‘मलाला’ला ‘मसाला’ असे संबोधतो

आपण काहीही ट्विट किंवा पोस्ट करण्यापूर्वी ते वाक्य योग्य किंवी बरोबर आहे का? याची कितपत शहानिशा करतो.

| October 13, 2014 03:23 am

ट्विटर या सोशल मिडियाचा वापर सध्या सगळेच सेलिब्रेटी जोरदार करत आहेत. पण, आपण काहीही ट्विट किंवा पोस्ट करण्यापूर्वी ते वाक्य योग्य किंवी बरोबर आहे का? याची कितपत शहानिशा करतो. याचेच ताजे उदाहरण म्हणजे जॅकी भगनानी आणि नाओमी कॅम्पबेल हे आहेत. नुकतीच शांततेच्या नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलेल्या मलाला युसुफझाईला या दोघांनी शुभेच्छांच्या ट्विटमध्ये मलालाच्या नावातचं गडबड केली.
बॉलीवूड अभिनेता जॅकी भगनानी ट्विटरवरून मलाला युसुफझाईला नोबेल पारितोषिकाकरिता शुभेच्छा दिल्या. दुर्दैवाने, जॅकीने मलालाचे नाव मसाला असे चुकून पोस्ट केले.
jackky1
त्यानंतर त्याने ते ट्विट डिलेटसुद्धा केले. पण, चुकी तर झाली होती. हे ट्विटनंतर वायरल झाले आणि त्यावर ट्विटकरांनी जॅकीची खिल्ली उडविण्यास सुरुवात केली.

सुपरमॉडेल नाओमी कॅम्पबेललासुद्धा अशाच लाजीरवाण्या स्थितीला सामोरे जावे लागले. तिने मलालाच्या जागी मलेरिया असे टाइप केले होते.
naomimalala-tweet
त्यानंतर तिनेही आपले पोस्ट काढून टाकली आणि आपल्या चुकीबद्दल माफी मागितली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2014 3:23 am

Web Title: jackky bhagnani calls malala yousafzai masala
Next Stories
1 ‘पवित्र रिश्ता’नंतर दीर्घ सुट्टीवर जाणार अंकिता लोखंडे
2 बिनधास्त पण जबाबदार!
3 नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी फैय्याज
Just Now!
X