29 October 2020

News Flash

..म्हणून इन्स्टाग्रामने केला जॅकलिनचा सन्मान

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या जॅकलिनचा चाहतावर्ग बराच मोठा आहे.

जॅकलिन फर्नांडिस

‘श्रीलंकन ब्युटी’ अर्थात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या जॅकलिनचा चाहतावर्ग बराच मोठा आहे. इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर ती बरीच लोकप्रिय असून दोन कोटी फॉलोअर्सचा आकडा तिने नुकताच पार केला. त्यामुळे इन्स्टाग्राम एंटरटेन्मेंटच्या प्रमुखांकडून तिचा सन्मान करण्यात आला.

इन्स्टाग्रामवर कमी वेळात फॉलोअर्सच्या अधिकाधिक संख्येमुळे जॅकलीनने सर्वांत जलद गतीने वाढणाऱ्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा किताब पटकावला आहे. सोशल मीडियावरील ही प्रगती पाहून फेसबुक आणि इन्स्टाग्राम एंटरटेन्मेंटच्या भारतीय प्रमुखांनी जॅकलिनची प्रशंसा करत तिला पुरस्कार प्रदान केला.

Bigg Boss Marathi : आस्तादच्या आयुष्यातील खास व्यक्ती कोण माहित आहे का?

सोशल मीडियावर चाहत्यांशी कशाप्रकारे जोडून राहावं याची जाण जॅकलिनला आहे. रोजच्या जीवनातील घडामोडी, कार्यक्रम असे बरेच अपडेट्स ती इन्स्टाग्राम पोस्ट किंवा स्टोरीमधून चाहत्यांना देत असते. तिच्या पोस्टला चाहत्यांकडून लाखो लाइक्स आणि कमेंट्स मिळतात. इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून ती सतत फॉलोअर्सशी जोडून राहण्याचा प्रयत्न करते.

सध्या जॅकलिन ‘रेस ३’ आणि ‘दबंग टूर’च्या यशाचा आनंद लुटत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मीडिया टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर जॅकलिन आणि सलमान खान या जोडीला इन्स्टाग्रामवर नंबर वन ठरवलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 2:27 pm

Web Title: jacqueline fernandez new milestone on instagram felicitated by facebook and instagram
Next Stories
1 ‘धडक’पूर्वीच प्रदर्शित झाले ‘सैराट’चे चार रिमेक
2 जाणून घ्या नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत असणारी ‘ती’ तरुणी आहे तरी कोण?
3 Bigg Boss Marathi : आस्तादच्या आयुष्यातील खास व्यक्ती कोण माहित आहे का?
Just Now!
X