News Flash

Video: जॅकलिन फर्नांडिसनेही उडवली डेजी शहाची खिल्ली

सध्या याच संवादाची सोशल मीडियावर फार टेर उडवली जात आहे.

काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या आगामी ‘रेस- ३’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. सिनेमात सलमानसोबत जॅकलिन फर्नांडिस, डेजी शहा, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सिनेमात डेजीच्या तोंडी एक संवाद आहे. सध्या याच संवादाची सोशल मीडियावर फार टेर उडवली जात आहे.

वेगवेगळ्या प्रकारे सोशल मीडियावर हा संवाड व्हायरल होत आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये डेजी बोलते की, ‘अवर बिझनेस इज अवर बिझने, नन ऑफ युवर बिझनेस.’ याच संवादाची मदत घेऊन आता अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने डेजीची खिल्ली उडवली आहे. एवढेच नाही तर स्वतः डेजीनेच जॅकलिनला ही नवीन लाइन लिहिण्यासाठी मदतदेखील केली.

डेजी आणि जॅकलीनचा एक इन्स्टाग्राम फोटो समोर आला आहे. या फोटोत दोघीही बिईंग ह्युमनचं टी-शर्ट घालून उभ्या आहेत. या फोटोला कॅप्शन देताना जॅकलीनने लिहिले की, ‘अवर बिईंग ह्युमन इज अवर बिईंग ह्युमन, नन ऑफ युवर बिईंग ह्युमन.’ असे म्हटले जाते ही, जॅकलिनची ही पोस्ट ट्रोल करणाऱ्यांसाठी आहे, जे कारण नसताना सोशल मीडियावर जाणीवपूर्वक डेजीला ट्रोल करत आहेत.

नुकतेच ‘रेस- ३’ सिनेमाचे पहिले गाणे ‘हिरीये’ प्रदर्शित झाले. या गाण्यात जॅकलिनचा भन्नाट डान्स पाहायला मिळत आहे. या गाण्यात जॅकलिनने पोल डान्स केला आहे. यासाठी तिने कित्येक महिन्यांचे प्रशिक्षणही घेतले होते. प्रशिक्षण घेण्याच्या काळात जॅकलिनला अनेकदा दुखापतही झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 1:37 pm

Web Title: jacqueline fernandez too joking for daisy shah race 3 dialogue or somthing else see
Next Stories
1 ‘लवरात्री’वर विश्वहिंदू परिषदेचा आक्षेप, सलमान अडचणीत?
2 प्रियांका चोप्राच्या ‘या’ हिल्सची किंमत पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
3 Rare Moment : जेव्हा साऊथचे त्रिमुर्ती एकत्र येतात..
Just Now!
X