बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘बच्चन पांडे.’ हा चित्रपट अॅक्शन आणि कॉमेडिने भरलेला असणार आहे. साजिद नाडियाडवाला या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटाच्या स्टार कास्टमुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे. या चित्रपटात आता अक्षय कुमारसोबत पुन्हा एकदा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस दिसणार आहे.

जॅकलिनने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ती बच्चन पांडे या चित्रपटात काम करणार असल्याची माहिती दिली आहे. “बच्चन पांडे चित्रपटाच्या टीमसोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे” अशा आशयाचे कॅप्शन देत जॅकलिनने फोटो शेअर केला आहे.

Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
bade miyan chote miyan Vs maidan
अजय देवगण की अक्षय कुमार, कोणाच्या चित्रपटाने केली ग्रँड ओपनिंग? दोन्ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन….
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा

या संदर्भात तिने स्पॉटबॉयला मुलाखत देखील दिली. त्यावेळी “जेव्हा मी नाडियाडवालासाठी हाऊसफुलमध्ये ‘धन्नो’ गाणे केले तेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये खूपच नवीन होते. आमच्यामध्ये मैत्रीचे खूप चांगले नाते आहे. मी त्यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याचा आनंद घेत आहे. बच्चन पांडे, जुडवा आणि हाऊसफुल या चित्रपटानंतर आता पुन्हा नाडियाडवाला यांच्यासोबत काम करणार आहे. अक्षयसोबत पुन्हा काम करण्यासाठी मी वाट पाहू शकत नाही. मला त्यांच्या सोबत काम करायला नेहमीच मज्जा येते. मला खात्री आहे की आम्ही एकत्र धमाल करु” असे जॅकलिनने सांगितले.

ती पुढे म्हणाली, “मी नुकताच एका चित्रपटाचे चित्रीकरण संपवले आहे. आता दुसऱ्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले आहे आणि लवकरच बच्चन पांडेमध्ये भूमिका साकारणार आहे. यानंतर मी किक 2 च्या चित्रिकरणाला सुरूवात करणार आहे.”

दरम्यान, यापूर्वी अक्षय आणि जॅकलिनने हाऊसफूल २, हाऊसफूल ३ आणि बदर्स या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. आता ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात ते दिसणार आहेत. अक्षय आणि जॅकलिनसोबत क्रिती सेनॉन, अरशद वारसी हे कलाकार दिसणार आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करणार आहे. या चित्रपटासाठी चाहते फार उत्सुक आहेत.