‘जय मल्हार’ या मालिकेतील खंडोबाच्या व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता देवदत्त नागे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. जॉन अब्राहमच्या आगामी ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात तो भूमिका साकारत असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये देवदत्तची झलकही पाहायला मिळते.

या चित्रपटात तो खलनायकाची भूमिका साकारत आहे. ‘जय मल्हार’ या मालिकेत त्याने साकारलेल्या खंडोबाच्या व्यक्तिरेखेमुळे त्याला फार प्रसिद्धी मिळाली आणि बॉलिवूडमध्ये त्याने पदार्पण करावं अशी त्याच्या चाहत्यांचीही इच्छा होती. अखेर जॉनच्या या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करत आहे.

Satyamev Jayate Trailer: ‘दो टके की जान लेने के लिए ९ मिलीमीटर की गोली नही, ५६ इंच का जिगरा चाहिए’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात जॉनने भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या एका सीरिअल किलरची भूमिका साकारली आहे. जॉनसोबतच यामध्ये मनोज बाजपेयी, अमृता खानविलकर आणि आयशा शर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्यामुळे या चित्रपटात देवदत्त आणि अमृता असे दोन मराठमोळे चेहरे झळकणार आहेत. ‘सत्यमेव जनते’ला बॉक्स ऑफीसवर कसा प्रतिसाद मिळतोय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.