News Flash

मराठमोळ्या देवदत्त नागेचं बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण

'सत्यमेव जयते'मध्ये झळकणार 'जय मल्हार' फेम देवदत्त नागे

जॉन अब्राहम, देवदत्त नागे

‘जय मल्हार’ या मालिकेतील खंडोबाच्या व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता देवदत्त नागे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. जॉन अब्राहमच्या आगामी ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात तो भूमिका साकारत असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये देवदत्तची झलकही पाहायला मिळते.

या चित्रपटात तो खलनायकाची भूमिका साकारत आहे. ‘जय मल्हार’ या मालिकेत त्याने साकारलेल्या खंडोबाच्या व्यक्तिरेखेमुळे त्याला फार प्रसिद्धी मिळाली आणि बॉलिवूडमध्ये त्याने पदार्पण करावं अशी त्याच्या चाहत्यांचीही इच्छा होती. अखेर जॉनच्या या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करत आहे.

Satyamev Jayate Trailer: ‘दो टके की जान लेने के लिए ९ मिलीमीटर की गोली नही, ५६ इंच का जिगरा चाहिए’

येत्या १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात जॉनने भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या एका सीरिअल किलरची भूमिका साकारली आहे. जॉनसोबतच यामध्ये मनोज बाजपेयी, अमृता खानविलकर आणि आयशा शर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्यामुळे या चित्रपटात देवदत्त आणि अमृता असे दोन मराठमोळे चेहरे झळकणार आहेत. ‘सत्यमेव जनते’ला बॉक्स ऑफीसवर कसा प्रतिसाद मिळतोय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2018 7:20 pm

Web Title: jai malhar fame devdatta nage in john abraham satyamev jayte movie
Next Stories
1 Top 10: धडक सिनेमाच्या प्रमोशनच्या चर्चेपासून संजूच्या स्क्रिनिंगला कलाकारांनी लावलेल्या हजेरीपर्यंत, सर्व काही एका क्लिकवर
2 Satyamev Jayate Trailer: ‘दो टके की जान लेने के लिए ९ मिलीमीटर की गोली नही, ५६ इंच का जिगरा चाहिए’
3 VIDEO : अक्षय कुमार प्रस्तुत मराठी चित्रपट ‘चुंबक’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X