07 March 2021

News Flash

“४ हजार कोटी द्या चित्रपट ऑनलाईन रिलीज करतो”; निर्मात्याची खुली ऑफर

जगातील सर्वात महागडा चित्रपट कोण घेणार? नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉनलाही पडला प्रश्न

करोना विषाणूनं संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. जगभरातील कोट्यवधी लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. परिणामी उद्योगधंदे पार ठप्प पडले आहेत. या करोनानं अगदी जेम्स बॉण्डला देखील सोडलं नाही. जगातील सर्वाधिक लोकप्रिय गुप्तहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॉण्डला देखील करोनाचा जोरदार फटका बसला आहे.

जेम्स बॉण्ड सीरिजमधील ‘नो टाईम टू डाय’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. परंतु वाढत्या करोना संक्रमणामुळे या चित्रपटाचं प्रदर्शन पुन्हा एकदा लांबणीवर गेलं आहे. दरम्यान हा चित्रपट थिएटरऐवजी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करावा अशी मागणी काही ब्रॉडकास्टर्स करत आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे त्यांच्या या मागणीचा स्विकार करत निर्मात्यांनी थेट ६०० मिलिअन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच जवळपास ४ हजार ४०० कोटी रुपयांची मागणी केली आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – आली लहर केला कहर; अभिनेत्रीने वाढदिवशी केला ११ हजार फुटांवरुन स्टंट

‘जेम्स बॉण्ड: नो टाईम टू डाय’ हा चित्रपट अभिनेता डॅनिअल क्रेगचा शेवटचा बॉण्डपट आहे. त्यामुळे चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. खरं तर निर्मात्यांच्या नियोजनाप्रमाणे हा चित्रपट मे महिन्यातच प्रदर्शित होणार होता. परंतु करोनामुळे चित्रपटाची तारीख डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. मात्र करोनाचं सावट अद्याप गेलेलं नाही. परिणामी आता २०२१ मध्येच सिनेमागृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करावा लागेल अशी परिस्थिती उद्भवली आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – ‘ती माझ्या मांडीवर बसली होती’; अभिनेत्याच्या कॉमेंटवर शेफाली संतापली, म्हणाली…

या पार्श्वभूमीवर नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईन, हॉटस्टार यांसारख्या काही बड्या ब्रॉडकास्टर्सने चित्रपट ऑनलाईन प्रदर्शित करावा असा सल्ला निर्मात्यांना दिला. लक्षवेधी म्हणजे त्यांचा हा सल्ला निर्माते मायल जी विल्सन यांना मान्य आहे. “मला ४ हजार ४०० कोटी रुपये द्या अन् कुठल्याही अ‍ॅपवर चित्रपट प्रदर्शित करा” अशी खुली ऑफर त्यांनी ब्रॉडकास्टर्सला दिली आहे. त्यांची ही ऑफर अद्याप कुठल्याही ब्रॉडकास्टरने स्विकारलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 1:57 pm

Web Title: james bond makers demand 600 million to release no time to die on ott platform mppg 94
Next Stories
1 …तर जेनेलियासोबत झालं असतं ब्रेकअप; रितेशने सांगितला मजेदार किस्सा
2 सुझानच्या फोटोवर हृतिकची कमेंट; दोघं पुन्हा येणार एकत्र?
3 होणाऱ्या पतीसोबत काजल अगरवालने शेअर केला फोटो
Just Now!
X