21 October 2020

News Flash

अनूप जलोटांसोबत असलेल्या नात्यावर जस्लीनचे वडिल म्हणतात…

'जेव्हा अनूप जलोटा आणि जस्लीनने त्यांच्या नात्याचा खुलासा केला, तेव्हा आपल्याला आणि कुटुंबाला आश्चर्याचा धक्काच बसला'

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो ‘बिग बॉस’च्या बाराव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. जोडीदार या थीमसह प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या शोमध्ये सध्या सर्वाधिक चर्चा होत आहे ती म्हणजे ‘भजन सम्राट’ अनूप जलोटा यांची. जेव्हापासून अनूप जलोटा यांनी शोमध्ये एंट्री घेतली आहे तेव्हापासून सोशल मीडियावर फक्त त्यांची आणि त्यांच्या प्रेयसीची चर्चा सुरु आहे. अनूप जलोटा आपली जोडीदार जस्लीनसोबत शोमध्ये दाखल झाले आहेत. दोघांमध्ये जवळपास ३७ वर्षाचं अंतर आहे. आपण आणि जस्लीन मथारु रिलेशनशिपमध्ये असल्याचा त्यांनी खुलासा केला आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. अभिनेता सलमान खानच नाही तर सर्वसामान्यही संभ्रमात पडले होते. दरम्यान रोज चर्चा होणाऱ्या या नव्या जोडीबद्दल अजून एक खुलासा समोर आला आहे.

जस्लीन मथारूच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांनी मुलाखत दिली असून त्यांनी काही खुलासे केल आहेत. केसर मथारु यांनी त्यांनी जेव्हा अनूप जलोटा आणि जस्लीनने त्यांच्या नात्याचा खुलासा केला, तेव्हा आपल्याला आणि कुटुंबाला आश्चर्याचा धक्काच बसला असं सांगितलं. ‘मी या नात्याला कधीच स्विकारु शकत नाही. मी कधीच त्यांना आशिर्वाद देणार न नाही, आणि त्यांच्यापासून दोन हात लांब राहणंच पसंत करेन’, अशी प्रतीक्रिया केसर मथारु यांनी दिली आहे.

केसर मथारु यांनी सांगितलं की, ‘तीन ते चार वर्षांपूर्वी गाणं सुधारण्यासाठी आपणच जस्लीनची भेट अनूप जलोटांशी घडवून दिली होती. त्यांच्यात काहीतरी सुरु आहे याची मला किंवा कुटुंबाला साधी कल्पनाही नव्हती’.

पुढे त्यांनी सांगितलं आहे की, ‘मला सांगण्यात आलं होतं की दोघं गुरु आणि शिष्या म्हणून बिग बॉसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. जेव्हा कार्यक्रमात त्यांच्या नात्याची घोषणा झाली तेव्हा माझा आणि कुटुंबाचा विश्वासच बसत नव्हता’.

अनूप जलोटा आणि जस्लीन मथारुने बिग बॉसच्या प्रीमिअर नाइटमध्ये सलमान खानसमोर आपल्या नात्याचा खुलासा केला होता. बिग बॉसमधील दुसऱ्याच दिवशी झालेल्या पहिल्या टास्कमध्ये सदस्यांनी त्यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता ही जोडी जेव्हा बाहेर येईल तेव्हाच नेमकं काय खरं आणि काय खोटं हे समोर येईल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2018 8:09 pm

Web Title: jasleen matharu father reaction on relationship with anup jalota
Next Stories
1 PVR मधले मंटोचे शो रद्द, नंदिता दासने व्यक्त केली तीव्र नाराजी
2 मैदान गाजवणारा विराट आता रुपेरी पडदाही गाजवणार ?
3 Happy Birthday Gulshan Grover : जाणून घ्या, बॉलिवूडच्या ‘बॅडमॅन’विषयी
Just Now!
X