24 September 2020

News Flash

VIDEO : गोविंदाच्या गाण्यावर जया बच्चन थिरकल्या

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल

जया बच्चन

‘फगली’ स्टार मोहित मारवाहने सेलिब्रिटी स्टाइलिस्ट अंतरा मोतीवालाशी नुकतीच लग्नगाठ बांधली. युएईमध्ये पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला बॉलिवूडचे बरेच सेलिब्रिटी हजर होते. अर्जुन कपूर, सोनम कपूर, रेहा कपूर, शनाया कपूर, अनिल कपूर, संजय कपूर असा पूर्ण परिवार उपस्थित होता. तर श्रीदेवीसुद्धा पती बोनी कपूर आणि खुशी- जान्हवी या दोन मुलींसह लग्न समारंभाला पोहोचली होती. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच जया बच्चन यांचा एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओमध्ये जया बच्चन मोहितच्या रिसेप्शन पार्टीमध्ये डान्स करताना पाहायला मिळत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत जया बच्चन गोविंदाच्या ‘हुस्न है सुहाना’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. अभिषेक बच्चनसोबत जया यांनी लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.

PHOTOS: कानपूरमध्ये अंकित तिवारीचा विवाहसोहळा संपन्न

अभिनेता मोहित मारवाहने २० फेब्रुवारी रोजी प्रेयसी अंतराशी लग्न बांधली. १९ फेब्रुवारी रोजी मेहंदी आणि संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. करण जोहर, अथिया शेट्टी, करिश्मा कपूर असे बरेच सेलिब्रिटी या ‘बिग फॅट वेडिंग’ला उपस्थित होते. मोहितच्या वरातीत चुलत भाऊ अर्जुन कपूरनेही काका अनिल कपूरसोबत नाचताना पाहायला मिळाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 2:04 pm

Web Title: jaya dances like never before on govinda movie tunes watch video
Next Stories
1 मी काहीही गैर वागलो नाही; आरोपांवर पपॉनचे स्पष्टीकरण
2 PHOTOS: कानपूरमध्ये अंकित तिवारीचा विवाहसोहळा संपन्न
3 ‘नटरंग’ फेम सोनाली कुलकर्णी कर्जत महोत्सवास येणार
Just Now!
X