28 October 2020

News Flash

श्रीदेवी नव्हे, तर या अभिनेत्रीची फॅन आहे जान्हवी

याच प्रश्न-उत्तरांवेळी जान्हवीने तिच्या आवडत्या अभिनेत्रीच्या नावाचा खुलासा केला आहे.

जान्हवी कपूर

बॉलिवूडची नवोदित अभिनेत्री जान्हवी कपूरचा आगामी चित्रपट ‘धडक’ या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जान्हवी आणि इशान खट्टर या दोघांच्या बॉलिवूडमधील करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही नवोदित कलाकारांना चित्रपटासाठी जेवढी मेहनत घेतली आहे. त्यापेक्षा कैकपटीने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी घेतल्याचं पाहायला मिळतंय. या कलाकारांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी जाऊन चित्रपटाचं प्रमोशन केलं असून त्यांच्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. याच प्रश्न-उत्तरांवेळी जान्हवीने तिच्या आवडत्या अभिनेत्रीच्या नावाचा खुलासा केला आहे.

चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना जान्हवी -इशान वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. याच मुलाखतीदरम्यान जान्हवीला कोणता चित्रपट आणि कलाकार आवडतो असं विचारण्यात आलं होतं. त्यावर जान्हवीने पटकन ‘ओम शांति ओम’ या चित्रपटाचं नाव घेत त्यातील दिपीका पदुकोन आणि शाहरुख खान यांची केमिस्ट्री आवडल्याचं सांगितलं. ‘ओम शांति ओम’ चित्रपटामध्ये या दोघांची केमिस्ट्री उत्तम होती. त्यामुळे मी त्यांची फॅन असल्याचं ती म्हणाली.

इतकंच नाही तर या चित्रपटाप्रमाणे ‘टायटॅनिक’ हा चित्रपटही माझा आवडता असून मी आणि खुशीने कित्येकदा या चित्रपटातील डायलॉग्स बोलून दाखविले आहेत.

दरम्यान, जान्हवी दिपीकाबरोबरच मधुबाला, मीना कुमारी, वहिदा रहेमान या सारख्या अभिनेत्रींची मोठी फॅन असून त्यांचे अनेक चित्रपट तिने पाहिले आहेत. त्यामुळे या अभिनेत्रींप्रमाणे गुणी अभिनेत्री होऊन मोठ्या पडद्यावर नाव कमवायची इच्छा असल्याचं तिने सांगितलं. जान्हवीने मधुबाला यांचा ‘मुगल ए आझम’, ‘चलती का नाम गाडी’ यासारखे चित्रपट पाहिले आहेत. त्यांचे हे चित्रपट पाहून माझ्यात प्रचंड उर्जा संचारते, असं जान्हवीने सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 1:28 pm

Web Title: jhanvi kapoor movie dhadak fan
Next Stories
1 लंडनच्या ट्रेनमधील विरुष्काचा ‘हा’ फोटो होतोय व्हायरल
2 Sacred games: आक्षेपार्ह संवादासाठी अभिनेता जबाबदार नाही: हायकोर्ट
3 ‘सेक्रेड गेम्स’ला फटका; वेब सीरिजचे नवीन भाग प्रदर्शित होणार नाहीत
Just Now!
X