19 September 2020

News Flash

Photo : जॉन सीनाने शेअर केलेल्या मीम्सवर शिल्पा शेट्टीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

अभिनेता मनीष पॉलनेदेखील या फोटोवर कमेंट केली आहे

एखादा नवीन चित्रपट प्रदर्शित झाला की त्याचे मीम्स लगेच व्हायरल होतात. अनेक वेळा या मीम्समध्ये कलाविश्वातील काही सेलिब्रिटींचा समावेश असतो. आतापर्यंत अनुष्का शर्मा, अक्षय कुमार, सलमान खान, विवेक ओबेरॉय, परेश रावल या सारख्या कलाकारांचे मीम्स व्हायरल झाले आहेत. त्यातच आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं एक मीम्स व्हायरल होत असून हे मीम्स डब्ल्युडब्ल्युई खेळाडू जॉन सीना (John Cena) याने सोशल मीडियावर शेअर केलं आहे. जॉन सीनाने शेअर केलेल्या मीम्सवर शिल्पानेदेखील हटके कमेंट केली आहे.

जॉन सीनाने शेअर केलेल्या मीम्समध्ये स्टीव्हन एण्डरसनचा फोटो मॉर्फेड केला असून त्यावर शिल्पा शेट्टीचा चेहरा लावला आहे. या फोटोला त्याने ‘स्टोन कोल्ड शिल्पा शेट्टी कुंद्रा’ असं कॅप्शन दिलं आहे. विशेष म्हणजे हा फोटो खुद्ध जॉन सीनाने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Cena (@johncena) on

या मीम्सवर शिल्पाने तिची प्रतिक्रिया दिली आहे. हा फोटो शिल्पानेदेखील तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावेळी ‘कूल, हे खूप मजेदार आहे’, असं कॅप्शन शिल्पाने दिलं आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरस होत असून अभिनेता मनीष पॉलनेदेखील या फोटोवर त्याचं मत व्यक्त केलं आहे.

दरम्यान, जॉन सीनाने काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टीच्या मुलाला वियानला एक खास मेसेज दिला होता. वियान जॉन सीनाचा मोठा चाहता असून एका कार्यक्रमामध्ये त्याने जॉन सीनाविषयी त्याचं मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर जॉन सीनाने वियानला एक खास मेसेज दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2019 11:48 am

Web Title: john cena share a meme on shilpa shetty bollywood actress gave reply ssj 93
Next Stories
1 बॉलिवूडच्या या अभिनेत्रीमुळे मी पाहिले कलाविश्वात येण्याचे स्वप्न – कियारा अडवाणी
2 Super 30 : चित्रपटातील हा प्रसंग पाहून आनंद कुमारांच्या आईला अश्रू अनावर
3 Box Office Collection : जाणून घ्या, ‘सुपर ३०’ची पहिल्या दिवसाची कमाई
Just Now!
X