जॉन अब्राहम आणि इमरान खानचा अ‍ॅक्शन पकॅ असलेल्या ‘मुंबई सागा’ सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. या सिनेमात जॉन आणि इमरानची दमदार टशन पाहायला मिळणार आहे. सिनेमात जॉन अब्राहम एका गुंडाच्या भूमिकेत झळकणार आहे. तर इमरान हाश्मी पोलिसाच्या वर्दीत गुंडांचा बंदोबस्त करताना दिसून येणार आहे. या सिनेमात 80 ते 90 च्या दशकातील मुंबई आणि तेव्हाची परिस्थिती दाखवण्यात आलीय.

ट्रेलरच्या सुरुवातीलाच जॉन अब्राहमचा बेधडक अंदाज पाहायला मिळतोय. अमर्त्य राव हे जॉनच्या भूमिकेचं नाव असून तो मुंबईतील विक्रेत्यांकडून हप्ता मागणाऱ्यांच्या विरोधात लढताना दिसून येतंय. काजल अग्रवाल अमर्त्य रावच्या पत्नीची भूमिका साकारतेय. तर अमर्त्य रावच्या मागवर असलेल्या पोलिसाच्या भूमिकेत इमरान हाश्मी झळकतोय. यासोबत सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सुनिल शेट्टीदेखील एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसून येतोय. यासोबतच महेश मांजरेकर आणि अमोल गुप्ते यांच्या भूमिकांची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय.

जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मी सोबतच सिनेमाती अनेक कलाकालांनी सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केलाय. काही तासातच या ट्रेलरला तुफान लाईक्स मिळाले आहेत.

पोलीस असो वा राजकारणी कुणालाही न घाबरता आपल्या भूमिकेवर ठाम असणारा अमर्त्य राव अखेर राजकारण्यांच्या जाळ्यात कसा अडकला जातो. गुन्हेगारीकडे तो कसा वळतो? आणि चोर पोलिसाच्या खेळात नेमकं कोण जिंकतं हे तर सिनेमा पाहिल्यानंतर लक्षात येईलच. पण सिनेमात जॉन आणि इमरानची टक्कर पाहायला मिळणार हे तर ट्रेलरवरुन लक्षात येतंय. येत्या 19 मार्चला ‘मुंबई सागा’ चित्रपटगृहात धडकणार आहे.संजय गुप्ता यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.