News Flash

Judwaa 2 song Chalti Hai Kya 9 Se 12: ‘चलती है क्या ९ से १२’ गाण्याला वरुण, जॅकलिन, तापसीचा हटके ट्विस्ट

गाण्यात राजा आणि प्रेम या दोघांचीही झलक पाहावयास मिळते.

चलती है क्या ९ से १२, जुडवा २, वरुण धवन, तापसी पन्नू, जॅकलिन फर्नांडिस

सलमान खानच्या ‘जुडवा’ चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: खळखळून हसण्यास भाग पाडले होते. मनोरंजनाची पर्वणी ठरलेल्या या चित्रपटाचा सिक्वल ‘जुडवा २’ आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी आज गणेश चुतर्थीच्या शुभमुहुर्तावर चित्रपटातील ‘चलती है क्या ९ से १२’ हे पहिलेच गाणे प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटात वरुण धवन, तापसी पन्नू आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या मुख्य भूमिका आहेत.

वाचा : तिहेरी तलाक, राइट टू प्रायव्हसीवर ट्विंकलचा विनोद वाचलात का?

सिक्वलमधील राजा, प्रेम, रुपा आणि मालाने १९९७ साली आलेल्या ‘जुडवा’तील ‘टन टना टन’ गाणे त्यांच्या हटके स्टायलमध्ये आणले आहे. पण, जर सलमान खान आणि करिष्मा कपूरने मारलेले लटके झटके पाहावयाचे असतील तर तुम्हाला जुने गाणेच पाहावे लागेल. कारण गाण्याच्या आताच्या व्हर्जनला कंटेम्पररी स्टायल ट्विस्ट देण्यात आला आहे. जेणेकरून आजच्या तरुणाईला या गण्याची भुरळ पडू शकेल.

वाचा : ‘सैराट’साठी करण जोहरला मदत करण्यास नागराज मंजुळेचा नकार!

गाण्यात राजा आणि प्रेम या दोघांचीही झलक पाहावयास मिळते. त्यातील एकजण सौंदर्यवती जॅकलिनसह स्टेजवर थिरकताना दिसतो तर, दुसरा तुरुंगामध्ये हॉट जेलर तापसी पन्नूसह नाचताना दिसतो. गेल्या काही चित्रपटांमध्ये अॅक्शन पॅक अवतारात दिसलेली तापसी यावेळेस तिच्या हटके लूकने सर्वांचेच लक्ष वेधण्यात यशस्वी ठरलीय. या रिव्हर्स व्हर्जनला संदीप शिरोडकरने संगीतबद्ध केले असून, देव नेगी आणि नेहा कक्कर यांनी गायले आहे.

गाणे प्रदर्शित करण्यापूर्वी वरुण धवनने त्याबद्दल बरीच हवा निर्माण केली होती. याच गाण्यावर करिष्मासोबत ठुमके लावत त्याने लोकांमध्ये नव्या गाण्याविषयी उत्सुकता निर्माण केलेली. त्याचा व्हिडिओही त्याने सोशल मीडियावर शेअर केलेला. डेव्हिड धवन दिग्दर्शित आणि साजिद नाडियादवालाची निर्मिती असलेला ‘जुडवा २’ येत्या २९ सप्टेंबरला प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 1:13 pm

Web Title: judwaa 2 song chalti hai kya 9 se 12 varun dhawan jacqueline taapsee pannu
Next Stories
1 एक वर्षाची झाली मिशा; शाहिदने शेअर केला क्यूट सेल्फी
2 तिहेरी तलाक, राइट टू प्रायव्हसीवर ट्विंकलचा विनोद वाचलात का?
3 Sairat remake : ‘सैराट’साठी करण जोहरला मदत करण्यास नागराज मंजुळेचा नकार!
Just Now!
X