10 July 2020

News Flash

कबीर बेदींनी खरंच सनी लिओनीचा नंबर मागितला होता? जाणून घ्या खरं कारण

सनीने तिच्या पतीचा नंबर दिला?

बॉलिवूड फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या सेलिब्रिटी कॅलेंडरचं अलिकडेच प्रकाशन झालं. या कार्यक्रमामध्ये अभिनेता कबीर बेदी यांनी सनी लिओनीचा फोन नंबर मागितल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर याविषयी कलाविश्वात आणि चाहत्यांमध्ये चर्चाही रंगल्याचं पाहायला मिळालं. मात्र याप्रकरणी कबीर बेदी नाराज असून त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करत खरी घटना सांगितली आहे.

कबीर बेदी यांनी सनीचा नंबर मागितल्यानंतर तिने तिच्या पतीचा डॅनिअल वेबरचा नंबर दिल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे. “मी सनी लिओनीचा नंबर मागितला ही चुकीची माहिती आहे. तसंच हे अत्यंत अपमानास्पद आहे. डब्बू रत्नानीच्या पार्टीमध्ये मी सनीचा नव्हे तर तिच्या पतीचा डॅनिअल वेबरचा नंबर मागितला होता आणि तिने तो दिलादेखील. आता माझ्याकडे डॅनिअलचा नंबर आहे. मात्र माझ्याविषयी जी माहिती समोर येते ती अत्यंत अपमानास्पद आहे”, असं ट्विट कबीर बेदी यांनी केलं आहे.

सोबतच मनोरंजनविश्वाशी निगडीत ज्या संकेतस्थळाने ही चुकीची माहिती दिली. त्या संकेतस्थळावरुन ती बातमी काढून टाकण्याची आणि याविषयी स्पष्टीकरण देण्याचंही कबीर बेदीने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पाहा : संपत्तीमध्येही सलमान आहे ‘दबंग’; जाणून घ्या कुठे काय आहे प्रॉपर्टी

 दरम्यान, डब्बू रत्नानीच्या कॅलेंडर प्रकाशनावेळी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. डब्बू रत्नानीच्या या वर्षीच्या कॅलेंडरमध्ये अनेक लोकप्रिय कलाकारांच्या फोटोचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कियारा आडवाणी, विद्या बालन, शाहरुख खान या कलाकारांच्या फोटोचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2020 11:33 am

Web Title: kabir bedi tweet on sunny mobile number kabir bedi angry allegations on asked sunny leone mobile number ssj 93
Next Stories
1 भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांचा ‘बाहुबली’ अवतार, शेअर केला भन्नाट व्हिडीओ
2 ‘मिस्टर इंडिया’च्या रिमेकवरुन दिग्दर्शकावर भडकली सोनम कपूर
3 गाव तेथे चित्रपटगृह!
Just Now!
X