01 March 2021

News Flash

Video : तीन पिढ्यांभोवती फिरणारा ‘त्रिभंग’; पाहा, चित्रपटाचा ट्रेलर

मिथिला पालकर- काजोल पहिल्यांदाच शेअर करणार एकत्र स्क्रीन

२०२१ या नव्या वर्षात अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यातलाच एक चित्रपट म्हणजे ‘त्रिभंग’. अभिनेत्री काजोल, तन्वी आझमी आणि मिथिला पालकर यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘त्रिभंग’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरवरुन या चित्रपटाची कथा ही तीन महिलांभोवती फिरताना दिसते. दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये चित्रपटाची कथा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यात काजोल लहानपणापासून तिच्या आईचा तिरस्कार करत असते. मात्र, कालांतराने तिला तिची चूक समजते आणि ती तिच्या आईचा स्वीकार करते. तसंच या ट्रेलरमध्ये काजोल चित्रपटातील तीनही स्त्रियांची ओळख करुन देते. त्यात पहिली अभंग ( तन्वी आझमी) – जी कायम काही ना काही तरी नवीन लिहित असते. दुसरी समभंग (मिथिला पालकर) जी जीवनात समतोल राखून आहे. तर तिसरी त्रिभंग( काजोल).

 

View this post on Instagram

 

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial)

दरम्यान, या चित्रपटातून तीन पिढ्यांमधील अंतरावर भाष्य करण्यात येणार आहे. हा चित्रपट १५ जानेवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यात काजोल, मिथिला व्यतिरिक्त कुणाल रॉय कपूर, वैभव तत्ववादी हे कलाकारदेखील झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी केलं असून निर्मिती अजय देवगणने केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 4:52 pm

Web Title: kajol tanvi azmi and mithila palkar starrer tribhanga trailer is out ssj 93
Next Stories
1 Video: बिग बॉसच्या घरात राहुल महाजनने केला पोल डान्स
2 ‘बिग बॉस’च्या घरात प्रेमाचे वारे; अलीने प्रपोज करताच जॅस्मीनने दिलं ‘हे’ उत्तर
3 आता होणार ‘तांडव’, सैफच्या आगामी सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित
Just Now!
X