अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची घटना प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली. सुशांतच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी गेल्या सहा महिन्यांपासून तो नैराश्यात होता असं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे त्याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून सोशल मीडियावर नवा वाद सुरू आहे. सर्वसामान्यांपासून कलाकारांपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर सुशांतविषयी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेत्री काजोलने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी गप्पा मारल्या. त्यांच्या प्रश्नांची तिने उत्तरं दिली. त्यातच एका चाहत्याने तिला सुशांतविषयी एक शब्द बोलण्यास सांगितलं. यावर उत्तर देताना काजोल म्हणाली, ‘दु:खद’. या प्रश्नोत्तरामध्ये काजोलने नवोदित कलाकारांसाठीही महत्त्वपूर्ण सल्ला दिला. ‘जसे आहात तसे राहा. कोणाची कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका’, असा सल्ला तिने दिला.

आणखी वाचा : “माझ्याशी पंगा घेतलास तर..”; सोनू निगमचा भूषण कुमारला इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काजोल ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात अजय देवगणसोबत झळकली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. सध्या काजोल तिच्या कुटुंबीयांसोबत क्वारंटाइनचा वेळ घालवत आहे. सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असून विविध फोटो व व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.