08 December 2019

News Flash

अनुराग कश्यपच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला अशाप्रकारे मिळाली ‘सेक्रेड गेम्स २’मधील भूमिका

कल्की या सीरिजमध्ये बात्या अबेलमनची भूमिका साकारणार आहे

नेटफ्लिक्सवर सर्वाधिक चर्चिली गेलेली वेबसीरिज ‘सेक्रेड गेम्स’चा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी ‘सेक्रेड गेम्स’चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या नव्या भागामध्ये जुन्या कलाकारांसोबत काही नवे चेहरेही पाहायला मिळणार आहे. या भागात १० वर्षांपासून कलाविश्वात कार्यरत असणारी अभिनेत्री कल्की कोचलीनदेखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या सीरिजच्या निमित्ताने कल्कीने तिच्या ऑडिशनबाबतचा एक किस्सा सांगितला आहे.

२००९ रोजी ‘देव डी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी कल्की ‘सेक्रेड गेम्स २’मध्ये महत्त्वाची व्यक्तीरेखा साकारणार आहे. कल्की स्वत: ‘सेक्रेड गेम्स’ची मोठी चाहती असून या सीरिजमध्ये काम करणं ही तिची मनापासून इच्छा होती. मात्र या सीरिजचं ऑडिशन दिल्यानंतर तिला तीन आठवडे प्रतीक्षा करावी लागली होती.

“एक दिवस अचानकपणे मला ‘सेक्रेड गेम्स २’च्या ऑडिशनसाठी फोन आला होता. त्यानुसार मी ऑडिशन देण्यासाठी गेले. मात्र, ऑडिशन दिल्यानंतर तीन आठवडे उलटले तरीदेखील मला कोणताही फोन आला नाही. त्यामुळे कदाचित माझ्या हातून ही संधी गेली असं मला वाटलं. परंतु त्यानंतर काही काळ गेल्यानंतर पुन्हा मला एक फोन आला दुसऱ्या ऑडिशनसाठी बोलावलं,असं कल्की म्हणाली.

पुढे ती म्हणते, मी एकावर एक असे ऑडिशन देत होते. परंतु या सीरिजमध्ये मला काम मिळेल की नाही याविषयी ठोस असं काहीच समजत नव्हतं. अखेर तीन आठवड्यांनंतर मला फोन आला आणि या सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

दरम्यान, ‘सेक्रेड गेम्स २’मध्ये कल्की, बात्या अबेलमनची भूमिका साकारणार आहे. बात्या अबेलम ही गुरुजी यांची भक्त दाखविली आहे. या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी गुरुजी ही व्यक्तीरेखा साकारणार आहे. तर या सीरिजमध्ये सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, सुरवीन चावला, जतिन सरना, ल्यूक केन्नीसह इतर अनेक कलाकार भूमिका साकारणार आहे.

First Published on August 14, 2019 4:31 pm

Web Title: kalki koechlin reveals she did not got a call back for three weeks after sacred games 2 audition ssj 93
Just Now!
X