News Flash

‘मला अक्षय, शाहिद, हरमन, शाहरुख बद्दल…’, अभिनेत्याला वाचायचे प्रियांकाचे पुस्तक

सध्या त्याचे हे ट्विट चर्चेत आहे,

कमाल आर खानचे प्रत्येक ट्विट चर्चेचा विषय ठरते. विविध विषयांवर कोणीही विचारले नसताना हा स्वयंघोषित चित्रपट समीक्षक त्याची मते मांडताना दिसतो. सेलिब्रिटी त्याच्या ट्विटकडे फारसे लक्ष देत नसले तरी नेटकरी मात्र त्याच्या ट्विटची आतुरतेने वाट पाहात असतात. त्याला अनेक वेळा ट्रोल करतात. नुकताच केआरकेने प्रियांकाच्या पुस्तकाशी संबंधीत एक ट्विट केले आहे. हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

नुकतेच अभिनेत्री प्रियांका चोप्राचे ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात प्रियांकाने तिचा संपूर्ण जीवनप्रवास उलघडला आहे. तिने पुस्तकात काही चांगल्या गोष्टींचा उल्लेख केला तर काही वाईट अनुभवांचा देखील उल्लेख केला आहे. दरम्यान अभिनेता कमाल आर खानने देखील प्रियांकाचे पुस्तक वाचण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

‘मला माझी आवडती अभिनेत्री प्रियांका चोप्राचे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक वाचायचे आहे. कारण मला हरमन बवेजा, अक्षय, शाहीद, शाहरुख खान यांच्याविषयी सत्य जाणून घ्यायचे आहे. तसेच मला तिचा अस्थमा, धुम्रपान करण्याची सवय, खोटे उच्चार, खोटे नाक आणि तिच्या पेक्षा १० वर्षांनी लहान असणारा तिचा पती निक जोनास यांच्याविषयी देखील जाणून घ्यायचे आहे. खूप प्रेम आणि आदर’ या आशयाचे ट्विट केआरकेने प्रियांकावर निशाणा साधला आहे.

कमाल आर खानचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे. अनेकजण यावर कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. ‘अनफिनिश्ड’ या पुस्तकामुळे प्रियांकाच्या खाजगी आयुष्यातील अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. एका मुलाखतीमध्ये प्रियांकाने, ‘मला कोणालाही उत्तर द्यावे लागेल असे मी माझ्या पुस्तकात लिहिलेले नाही. मी माझ्या जीवनातील अनेक गोष्टींचा या पुस्तकात उल्लेख केला आहे’ असे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 6:36 pm

Web Title: kamaal khan wants to read biography of priyanka chopra avb 95
Next Stories
1 ६ वर्षांनंतर ‘या’ चित्रपटात टायगर आणि क्रिती दिसणार एकत्र
2 Video : ‘मातृभाषेत काम करण्याचं समाधान वाटतं’
3 ‘स्वाभिमान’ जपणाऱ्या तिची कथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X