News Flash

‘2.0’ साठी अक्षयआधी या दोन सुपरस्टार्सना होती दिग्दर्शकाची पसंती

अक्षयचा चित्रपटातील लूक अनेकांना खूप आवडला. मात्र या चित्रपटासाठी अक्षय ही दिग्दर्शकाची पहिली पसंती नव्हतीच.

अक्षय कुमार

रजनीकांत, अक्षय कुमार, अॅमी जॅकसन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘२.०’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारनं खलनायकाची भूमिका साकारली आहे. अक्षयचा चित्रपटातील लूक अनेकांना खूप आवडला. मात्र या चित्रपटासाठी अक्षय ही दिग्दर्शकाची पहिली पसंती नव्हतीच. अक्षयआधी दोन सुपरस्टार्सच्या नावाचा विचार चित्रपटासाठी झाला होता.

या चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर यांची पहिली पसंती ही हॉलिवूडमधला प्रसिद्ध स्टार अर्नोल्ड श्वार्झनेगरला होती. मात्र काही कारणामुळे त्याच्यासोबत काम करण्याचा योग जुळून आला नाही. त्यानंतर खलनायकासाठी कमल हसन याचंही नाव चर्चेत होतं. अर्नोल्डनं नकार दिल्यानंतर कमल हसन आणि रजनीकांत यांनी एकत्र काम करावं असं शंकर यांना वाटतं होतं. दाक्षिणात्य चित्रपटातील दोन मोठ्या सुपरस्टारना बिग बजेट सिनेमात पाहण्याची वेगळीच पर्वणी चाहत्यांना लाभली असती. मात्र कमल हसन इंडियन २ चित्रपटात व्यग्र होते. त्यामुळे कमल ऐवजी अक्षय कुमारच्या नावाचा विचार करण्यात आला. अक्षयला ही भूमिका खूपच आवडली आणि त्यानं चित्रपट करण्यास होकार दिला.

‘2.0’ हा चित्रपट भारतातील सर्वांत महागडा आणि आशिया खंडातील सर्वाधिक बजेटचा दुसरा चित्रपट आहे. चित्रपटातील व्हीएफएक्सवर तब्बल ५५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला या चित्रपटासाठी जगभरातील ३००० हून अधिक तंत्रज्ञांनी काम केलं असून त्यापैकी १००० व्हीएफएक्स कलाकार आहेत. २९ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 6:19 pm

Web Title: kamal haasan was offered akshay kumars role in 20 reveals shankar
Next Stories
1 जाहिरातीत वकिलाचे कपडे घातल्याबद्दल अमिताभ बच्चनना बार काउन्सिलची नोटिस
2 सचिन पिळगांवकरसोबत प्रार्थना म्हणणार ‘लव्ह यु जिंदगी’
3 इटलीत होणाऱ्या दीप-वीरच्या लग्नाबद्दल पंतप्रधान म्हणतात..
Just Now!
X