21 January 2021

News Flash

…म्हणून कंगनाने घेतली संजय दत्तची भेट

तिने ट्विट करत दिली माहिती...

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिचा आगामी चित्रपट ‘थलाइवी’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे हैदराबाद येथे चित्रीकरण सुरु आहे. दरम्यान कंगनाने अभिनेता संजय दत्तची भेट घेतली असल्याचे समोर आले आहे. याबाबात तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली आहे.

नुकताच कंगनाने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने संजय दत्तशी भेट झाल्याचे म्हटले आहे. ‘हैदराबादमध्ये आम्ही एकाच हॉटेलमध्ये राहत आहोत हे कळताच आज सकाळी मी संजू सरांना भेटण्यासाठी गेले. मी त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली. पण जेव्हा मी त्यांना पाहिले तेव्हा ते हँडसम आणि निरोगी दिसत होते. मी तुमच्या निरोगी आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते’ या आशयाचे ट्विट कंगनाने केले आहे.

८ ऑगस्ट रोजी संजयला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याची करोना चाचणी देखील करण्यात आली. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे कळाले. ११ ऑगस्ट रोजी संजय दत्तने या संदर्भात सोशल मीडियाद्वारे माहिती दिली. आता संजय दत्तने कर्करोगावर मात केली असून त्याने आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 2:36 pm

Web Title: kangana ranaut met sanjay dutt in hydrabad avb 95
Next Stories
1 मराठी दिग्दर्शकाचा अटकेपार झेंडा, अक्षय इंडीकर यांना आशिया खंडातला प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर
2 Video : पूजा सावंत आणि धर्मेश सर यांच्याशी दिलखुलास गप्पा
3 “तुम्ही व्हिलन झालात म्हणूनच…,” मुंबई हायकोर्टाच्या निर्णयावर कंगनाने दिली प्रतिक्रिया
Just Now!
X