News Flash

‘मणिकर्णिका’मधील कंगनाचा दुसरा लूक व्हायरल

या रॉयल लूकवरुन नजर हटत नाही

सध्या बॉलिवूडमध्ये चरित्रपटांचे वारे वाहताना दिसत आहे. वर्षभरातील एकूण हिंदी सिनेमांच्या यादीवर नजर टाकली तर त्यात चरित्रपटांचाच भरणा अधिक दिसून येतो. याच चरित्रात्मक सिनेमांच्या यादीत कंगना रणौतच्या मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी सिनेमाची सर्वाधिक चर्चा आहे. सध्या राजस्थानमधील बिकानेर येथे या सिनेमाचे चित्रीकरण सुरू आहे. सिनेमाच्या सेटवरील काही फोटो सध्या सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होत आहेत. यात कंगनाच्या लूकचीच सर्वात जास्त चर्चा होताना दिसते.

या फोटोमध्ये कंगनाने लाल रंगाची साडी नेसली आहे. साडीच्या काठपदरापासून ते दागिन्यांपर्यंत तिचा रॉयल लूक समोर येतो. या सिनेमात झांशीच्या राणीचे शौर्य दाखवण्यात येणार आहे. राणीची भूमिका साकारणं काही सोपी गोष्ट नाही. पण या सिनेमाला योग्य न्याय देण्यासाठी कोणी सक्षम असेल तर ती एकमेव कंगना रणौतच आहे याबद्दल दिग्दर्शक निर्मात्यांच्या मनात किंचितही शंका नाही. सिनेमात कंगना अनेक साहसी दृश्य करताना दिसणार आहे. सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान कंगनाचे अनेक अपघातही झाले आहेत. तलवारबाजीचे दृश्य चित्रीत करत असताना तिच्या डोळ्याजवळ तलवार लागली. यात तिला टाकेही पडले.

यावर्षी १५ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील ब्राह्मण समुहाने ऐतिहासिक तथ्यांसोबत छेडछाड केल्याचा आरोप केला होता. यानंतर सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमात दाखवण्यात आलेल्या कोणत्याही दृश्यामुळे राणी लक्ष्मीबाईची प्रतिमा मलिन होणार नसल्याचे आश्वासन दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 6:17 pm

Web Title: kangana ranaut new look from manikarnika the queen of jhansi
Next Stories
1 Sacred Games : वेब सीरिजच्या विश्वात सैफचं पदार्पण, फर्स्ट लूक प्रदर्शित
2 जातीवाचक वक्तव्य केल्याने सलमान- कतरिना अडचणीत
3 वैभव तत्ववादी- अंकिता लोखंडे यांच्या नात्यात नवा बहर
Just Now!
X