बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे.सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरण आणि मुंबईविषयी केलेल्या काही वक्तव्यांमुळे अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे. यामध्येच प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर पीसी श्रीराम यांनी कंगनासोबत काम करण्यास नकार दिल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या या वक्तव्यावर आता कंगनाने उत्तर दिलं आहे.

“तुमच्यासारख्या महत्त्वाच्या व्यक्तीसोबत काम करण्याची संधी मी गमावली आहे. यात माझंच नुकसान आहे. माझ्यासोबत काम करताना तुम्हाला नेमकं कशामुळे अस्वस्थता वाटतंय हे माहित नाही. पण तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा मी आदर करते. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा”, असा रिप्लाय कंगनाने पीसी श्रीराम यांना दिला आहे.

आणखी वाचा- मुंबईत येण्यापूर्वीच कंगनाला आणखी एक दणका; सिनेमॅटोग्राफरने चित्रपट करण्यास दिला नकार

एका चित्रपटात कंगना रणौतची मुख्य भूमिका असल्यामुळे तो चित्रपट करण्यास मी नकार दिला आहे. हा चित्रपट करत असताना मला मनातल्या मनात फार अस्वस्थता वाटत होती. त्यामुळे माझं मत मी निर्मात्यांना सांगितलं आहे आणि त्यांनीदेखील माझ्या मताचा आदर केला आहे.जेव्हा एखादी गोष्ट योग्य आहे असं तुम्हाला वाटतं तेव्हाच असं काहीसं घडतं, असं ट्विट पीसी श्रीराम यांनी केलं होतं.

दरम्यान, पीसी श्रीराम हे कलाविश्वातील लोकप्रिय सिनेमॅटोग्राफर आहेत. त्यांनी आतापर्यंत हिंदी, मल्याळम, कन्नड, तामिळ आणि तेलुग अनेक भाषिक चित्रपटांसाठी काम केलं आहे.