05 March 2021

News Flash

‘इंडिया पाकिस्तान ना बन जाए संभालो यारों’, कंगनाचा शिवसेना आमदाराला टोला

तिचे हे ट्विट चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही मागील काही महिन्यांपासून तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. नुकतच कंगनाने एक ट्विट रिट्विट करत ‘इंडिया पाकिस्तान ना बन जाए संभालो यारों’ असे म्हणत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. कंगनानं रिट्विट करत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

कंगनाने ट्विटरवर एका यूजरचे ट्विट रिट्विट केले आहे. ‘जेव्हा मी मुंबई ही पाकव्याप्त कश्मीरप्रमाणे वाटत आहे असे म्हटलं होतं, तेव्हा मला धमकी दिली होती. भारतातील लोकांनो जे तुमच्यासाठी सर्व काही पणाला लावत आहेत आणि जे लोकं तुमच्याकडून सगळं काही काढून घेत आहेत अशा लोकांना ओळखा. तुम्ही ज्या लोकांवर विश्वास ठेवता तेच तुमचे भविष्य ठरवतात. इंडिया पाकिस्तान ना बन जाए संभालो यारों’ या आशयाचे ट्विट कंगनानं केलं आहे.

यापूर्वी कंगनाने दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन ट्विट केले होते. तेव्हापासून कंगना आणि गायक, अभिनेता दिलजीत दोसांज यांच्यामध्ये सोशल मीडियावर सातत्यानं वाद होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2020 6:27 pm

Web Title: kangana ranaut slams shiv sena mla pratap sarnaik avb 95
Next Stories
1 रेमोच्या प्रकृतीबाबत पत्नीने दिली माहिती, म्हणाली…
2 ..अन् ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर रोहित पवारांच्या डोळ्यात आलं पाणी
3 करोना रुग्णांची सेवा करणाऱ्या अभिनेत्रीला अर्धांगवायूचा झटका, काही दिवसांपूर्वी झाला होता करोना
Just Now!
X