बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता जवळपास दोन महिने होत आले आहेत. मुंबई पोलीस, बिहार पोलीस अन् आता ईडीमार्फत या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे या प्रकरणाची जबाबदारी आता सीबीआयकडे सोपवण्यात यावी अशी मागणी अभिनेत्री कंगना रणौतने केली आहे. तिने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत मुंबई पोलिसांवर टीका केली आहे. सर्वाधिक वाचकपसंती - सुशांतच्या एक्स गर्लफ्रेंडने केली CBI चौकशीची मागणी; व्हिडीओ होतोय व्हायरल. Mumbai police wants to rush the probe, Sanjay Raut saying they are almost done with the investigation, we deserve to know the truth #CBIForSSR @republic #justiceforSushanthSinghRajput @shwetasinghkirt @anky1912 pic.twitter.com/2SV1AwaFx7 — Team Kangana Ranaut (@KanganaTeam) August 13, 2020 सर्वाधिक वाचकपसंती - फक्त ‘सडक २’च नाही; ‘या’ सात व्हिडीओंनीही केलाय डिसलाईकचा विक्रम "संजय राऊत म्हणाले सुशांत प्रकरणातील चौकशी आता संपली आहे. मुंबई पोलिसांना हे प्रकरण संपवण्याची घाई आहे. मात्र आम्हाला सुशांतसोबत नेमकं काय घडलं हे जाणून घ्यायचं आहे. सुशांतला न्याय मिळालाच पाहिजे." अशा आशयाचं ट्विट कंगनाने आपल्या टीमच्या ट्विटर हँडलवरुन केलं आहे. यापूर्वी सुशांतची बहिणी श्वेता सिंह कीर्ती हिने देखील एका व्हिडीओद्वारे CBI चौकशीची मागणी केली होती. "सुशांतसोबत नेमकं काय घडलं? हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन सीबीआय चौकशीची मागणी करुया. या प्रकरणातील खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा मिळायलाच हवी. कोणाचंही आयुष्य असं उद्धवस्त करण्याचा अधिकार कोणालाही नाही. मी सुशांतच्या चाहत्यांना विनंती करतेय तुम्ही आमच्या पाठिमागे असेच खंभीरपणे उभे राहा. तुमच्यामुळेच आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळतेय." असं तिनं या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. View this post on Instagram #Repost @shwetasinghkirti with @repostsaveapp · · · We stand together as a nation for CBI Enquiry! Demanding an unbiased investigation is our right and we expect nothing but the truth to come out. #CBIForSSR #Warriors4SSR #justiceforSushanthSinghRajput @PMOIndia @narendramodi @AmitShah A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on Aug 12, 2020 at 9:45pm PDT सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात सुशांतच्या कुटुंबीयांनी अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे दोन वेळा रियाची ईडीने चौकशी केली आहे. या चौकशीमध्ये अनेक गोष्टींचा उलगडा झाला असून तिचे फोन कॉल्स रेकॉर्डदेखील समोर आले आहेत. यात रियाने AU नामक व्यक्तीला सर्वाधिक वेळा फोन केल्याचं आढळून आलं आहे. या प्रकरणी AU हे नाव समोर आल्यावर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र AU ही रियाच्या जवळची व्यक्ती असल्याचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. रिया आणि AU मध्ये ६३ फोन कॉल्स झाले. AU ही रियाची फॅमेली फ्रेंड असून तिचं नाव अनन्या उधास आहे. परंतु, रिया आणि अनन्यामध्ये इतक्या वेळा फोन का झाले हे अद्याप स्पष्ट न झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, रियाचे फोन कॉल्स रेकॉर्ड तपासल्यावर तिने महेश भट्ट यांनीदेखील फोन केले होते. तसंच तिने वडिलांना सर्वाधिक फोन केल्याचं पाहायला मिळालं.