देशात आज पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यासाठीची मतमोजणी सध्या सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी याबद्दल आपलं मत मांडत आहेत. अभिनेत्री कंगना रणौतनेही ट्विट करत आपलं मत मांडलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये ती म्हणते, “बांग्लादेशी आणि रोहिंग्या हीच ममताची सर्वात मोठी ताकद आहे. आणि जो ट्रेंड आहे त्यावरुन तर असंच दिसत आहे की तिथे हिंदू बहुसंख्य नाहीत. उपलब्ध माहितीनुसार, बंगाली मुस्लिम हा भारतातला सर्वाधिक गरीब आणि वंचित घटक आहे. छान, अजून एक काश्मिर तयार होत आहे”.

कंगनाचं हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी तिच्या या ट्विटवर कमेंट्स केल्या आहेत. एक युजर म्हणतो, भाजपाने चांगली लढत दिली. ३ पासून १०० च्या वर ही मोठी गोष्ट आहे. आशा करुया पुढे ते मोठा आकडा पार करतील.

आणखी वाचा- West Bengal Election 2021 Result Live Updates: ममतांचे द्विशतक, तर भाजपाची १०० पार करतानाही दमछाक

पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ आणि आसाम ही चार राज्ये तसेच पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. सर्वाधिक चुरस पश्चिम बंगालमध्ये आहे. ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस सत्ता राखणार की भाजपला संधी मिळणार याची उत्सुकता आहे. सुरुवातीचे कल हाती आले असून यानुसार राज्यात तृणमूल काँग्रेसची लाट कायम असून पुन्हा ममता बॅनर्जी विजयाची हॅटट्रिक करण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेस स्पष्ट बहुमत मिळवत पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता आहे. तर भाजपाची मात्र १०० च्या पुढेही जाताना दमछाक होण्याची शक्यता आहे.