News Flash

दारु पिऊन विमानात सुनील ग्रोव्हरवर ओरडला कपिल शर्मा?

गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांमध्ये विस्तव जात नाहीये

कपिल शर्मा आणि त्याच्या टीममध्ये असणाऱ्या मतभेदाच्या बातम्या सतत येत असतात. अनेकदा कपिल दारुच्या नशेत भांडण करतो असेही कळते. पण नुकतीच एक अशी बातमी समोर आली आहे ज्याने त्याच्या या वागण्यावर शिक्कामोर्तब होईल. ऑस्ट्रेलियाहून मुंबईत येणाऱ्या विमानात कपिल, सुनील प्रवास करत होते. त्यावेळी कपिल सर्वांसमोर सुनीलवर ओरडला तसेच त्याने रागात त्याच्यावर हातही उचलल्याचे कळते.

विमानात प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, काहीही कारण नसताना कपिल, सुनीलवर आक्रमक झाला. तो सुनीलला जोरजोरात ओरडून शिव्या देत होता. कदाचित ओरडून झाल्यावर कपिल शांत बसेल असा विचार करुन सुनील शांत होता.

त्या प्रवाशाने सांगितले की, कपिलचा आवाज संपूर्ण केबिनमध्ये ऐकू येत होता. तसेच त्याने, सुनीलवर हातही उचलला. यानंतर विमान कर्मचाऱ्यांनी मध्यस्ती केली आणि प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. यावर सुनीलने, कपिलची बाजू घेत त्याच्या वागणुकीकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले. या प्रकरणाबाबत सुनील किंवा कपिल यांच्यापैकी कोणाशीही बोलणे होऊ शकलेले नाही. पण कपिलच्या टीममधील एका सदस्याने सांगितले की, आम्हाला हे ऐकून अजिबात आश्चर्य वाटत नाहीये. कारण गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांमध्ये विस्तव जात नाहीये.

कपिल शर्मा जेव्हा कलर्ससाठी शो करायचा तेव्हाही त्या दोघांमध्ये अनेक मतभेद होते. त्यामुळेच ‘गुत्थी’ची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सुनीलने तो शोही सोडून दिला होता. त्यानंतर त्याने स्वतःचा एक नवा शो सुरु केला होता.

befikre-ranveer-singh-and-vaani-kapoor-in-the-kapil-sharma-show-hd-photos-1 kapil-sharma-for-anushka-and-salman-on-the-sets-of-the-kapil-sharma-show-1

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 5:53 pm

Web Title: kapil sharma allegedly assaults sunil grover aka dr mashhoor gulati on a flight
Next Stories
1 फोटो : करिनाचा लेकासोबत हा फोटो पाहिलात का?
2 ‘फुकरे रिटर्न’चे पहिले पोस्टर प्रदर्शित
3 आमिरने ‘दंगल’मधून कमविले १७५ कोटी?
Just Now!
X