News Flash

“आता कोणी पोलिसांच्या मृत्यूवर RIP म्हणणार नाही..”; अभिनेत्याचा संताप

युपीमध्ये चकमकीदरम्यान पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार

उत्तर प्रदेशात चकमकीदरम्यान आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पोलीस उपअधीक्षकाचाही समावेश आहे. कानपूर येथे पोलीस विकास दुबे नाकम गुंडाला अटक करण्यासाठी गेली असता ही चकमक उडाली. या दुदैवी प्रकरणावर अभिनेता कपिल शर्मा याने संताप व्यक्त केला आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या या गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडण्याची विनंती त्याने प्रशासनाला केली आहे.

अवश्य पाहा – उर्वशी रौतेलाने गौतम गुलाटीसोबत केलं लग्न?; फोटो पोस्ट करुन म्हणतोय शुभेच्छा द्या

“आज मी रेस्ट इन पीस बोलणार नाही. कारण जोपर्यंत आरोपी पकडले जात नाही तोपर्यंत शहिद झालेल्या त्या पोलिसांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. युपी पोलीस लवकरात लवकर त्या गुन्हेगारांना पकडतील.” अशा आशयाचे ट्विट करुन कपिल शर्मा याने शहिद पोलिसांना श्रद्धांजली वाहिली आहे. कपिलचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – सुशांतने आत्महत्या केल्यापासून अभिनेत्री पडली आजारी; होऊ लागलाय लो बीपीचा त्रास

हे प्रकरण काय आहे?

विकास दुबे नावाच्या एका गुंडावर ६० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांचं एक पथक विकास दुबेचा शोध घेत होते. पोलीस बिकरु गावात विकास दुबेच्या शोधात गेली असता गुंडांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. इमारतीवरुन पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार सुरु झाला. या हल्ल्यात पोलीस उपअधीक्षक देवेंद्र मिश्रा यांच्यासह तीन पोलीस उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल यांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शहीद झालेल्या पोलिसांसाठी शोक व्यक्त केला आहे. तसेच आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 12:05 pm

Web Title: kapil sharma eight policemen killed in encounter with criminals near kanpur mppg 94
Next Stories
1 गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांची शौर्यगाथा आता मोठ्या पडद्यावर
2 ‘२० दिवस होऊन गेले तरी आजही तुझ्या आठवणीने जाग येते,’ अभिनेत्रीची सुशांतसाठी भावनिक पोस्ट
3 प्रशांत दामलेंनी नाट्यरसिकांकडे केली ‘एवडुशी’ विनंती; म्हणाले…
Just Now!
X