News Flash

हिंमत असेल तर ये.. कपिल शर्माचे अक्षयला चॅलेंज

कपिलने हा चॅलेंजचा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे

सध्या बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार त्याचा आगमी चित्रपट ‘गुड न्यूज’च्या प्रमोशमध्ये व्यग्र आहे. दरम्यान छोट्या पडद्यावरील विनोदवीर कपिल शर्मा आणि त्याच्या संपूर्ण टीमने अक्षय कुमारला चॅलेंज दिले आहे. अक्षय कुमारच्या सकाळी लवकर उठण्याच्या सवयीमुळे कपिल शर्माने हे चॅलेंज दिले आहे.

कपिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कपिल शर्मा आणि त्याची संपूर्ण टीम भारती सिंह, कृष्णा अभिषेक, कीकू शारदा आणि चंदन प्रभाकर देखील दिसत आहे. व्हिडीओमध्ये कपिल ‘शूभ सकाळ मित्रांनो आता सकाळचे तीन वाजले आहेत. अक्षय तुला आमचे चॅलेंज आहे.. तु गेल्या वेळेस आम्हाला सहा वाजता उठवले होते. आता आम्ही ३ वाजता उठवतो आहोत. हिम्मत असेल तर ४ वाजता शूटसाठी ये. आम्ही जागे आहोत’ असे कपिल म्हणाला आहे.

काही दिवसांपूर्वी ‘हाऊसफूल ४’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये पोहोचला होता. दरम्यान चित्रपटाची संपूर्ण टीम त्याच्यासोबत होती. पण या भागाच्या चित्रीकरणासाठी कपिल शर्मा आणि त्याच्या संपूर्ण टीमला सकाळी ४ वाजता उठून चित्रीकरणची तयारी करावी लागली होती. इतकच नव्हे तर अभिनेता रितेश देशमुख आणि बॉबी देओलने सकाळी लवकर उठल्याचा व्हिडीओ पोस्ट केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 4:44 pm

Web Title: kapil sharma gave challenge to akshay kumar avb 95
Next Stories
1 कंडोम बाळगा आणि बलात्काऱ्यांना सहकार्य करा, निर्मात्याचे वादग्रस्त विधान
2 जेम्स बॉण्डनं केली कमाल; एका स्टंटमुळे पोहोचला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये
3 मोठे दिग्दर्शक मला त्यांच्या चित्रपटात स्थान देत नाहीत; अक्षय कुमारची खंत
Just Now!
X