News Flash

कपिल शर्माची ‘चिमुकली रॉकस्टार’, अनायराचा गोड डान्स व्हायरल

अनायरा सोशल मीडियावर होतेय व्हायरल

प्रसिद्ध कॉमेडीयन आणि अभिनेता कपिल शर्मा सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. नुकताच कपिल शर्माचा एक नवा शो नेटफ्लिक्सवर येत असल्याची घोषणा करण्यात आलीय.

कपिल शर्मा सोशल मीडियावर चांगलाच अ‍ॅक्टीव असतो. फेब्रुवारीमध्ये कपिल शर्मा दुसऱ्यांदा बाबा झालाय. 1 फेब्रुवारीला कपिलची पत्नी गिन्नीने मुलाला जन्म दिला. कपिलने सोशल मीडियावरुन ही बातमी चाहत्यांना दिली होती. यानंतर अनेकांनी कपिलला शुभेच्छा दिल्या होत्या. तर काही दिवसांपूर्वी कपिलने त्याच्या मुलीसोबतचा म्हणजेच अनायरासोबत एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोला चाहत्यांनी मोठी पसंती दिली. कपिलच्या गोड मुलीने सोशल मीडियावर सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Loksatta (@loksattalive)

नुकताच कपिलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अनायराचा एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओत कपिलची लाडकी मुलगी हनी सिंगच्या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. यावर कपिलने ‘माझी चिमुकली रॉकस्टार’ असं कॅप्शन लिहलं आहे. या व्हिडीओत अनायरा पॉप सिंगर हनी सिंगच्या ‘जिंगल बेल्स’ या गाण्यावर नाचतेय. त्यामुळे कपिलने हनी सिंगला देखील या व्हिडीओत टॅग केलंय.

कपिलच्या या गोड मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून व्हिडीओला मोठी पसंती मिळतेय. तसचं चिमुकल्या अनायराचं अनेकांनी कौतुक केलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 12:26 pm

Web Title: kapil sharma shares daughters video on his instagram story kpw 89
टॅग : Bollywood News
Next Stories
1 प्रियांकाचं ‘अनफिनिश्ड’ आता हिंदीतही..???
2 ‘स्लमडॉग मिलेनिअर’फेम अभिनेत्याने केला लैंगिक अत्याचाराच्या आरोपवर खुलासा
3 श्रेयाने शेअर केली गुड न्यूज, बेबी बंपसोबत फोटो केला शेअर
Just Now!
X