कलाविश्वात कलाकारांच्या अभिनयासोबतच त्यांच्या अफेअर, ब्रेकअप यांच्य चर्चा कायमच रंगत असतात. काही कलाकार जाहीरपणे त्यांच्या प्रेमाची कबुली देतात. तर, काही कलाकारांच्या मात्र अफेअरची जोरदार चर्चा रंगताना दिसून येते. विशेष म्हणजे यावेळी अभिनेता सतीश कौशिक आणि अर्चना पूरणसिंग यांच्याविषयी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. सतीश कौशिक यांनी अलिकडेच अर्चना पूरणसिंग या त्यांच्या क्रश असल्याचं सांगितलं आहे.
अलिकडेच अनुपम खेर, सतीश कौशिक आणि पंकज त्रिपाठी यांनी ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी सतीश कौशिक यांनी त्यांच्याशी निगडीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. विशेष म्हणजे एकेकाळी अर्चना पूरणसिंग या माझं क्रश होत्या असंही त्यांनी सांगितलं. कर्लस टीव्हीने याविषयीचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून सध्या तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
“अरे यार, या इथे कुठे आल्या. तुला माहित आहे कपिल, या माझं ३४ व्या क्रश आहेत”, असं सतीश कौशिक अर्चना पूरणसिंग यांच्याकडे पाहून म्हणाले. विशेष म्हणजे सतीश कौशिक यांचं हे वाक्य ऐकल्यानंतर आता आम्ही सगळ्यांनी इकडून निघून जायचं का असा मजेशीर सवाल अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांना विचारला.
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर या नव्या भागाचा प्रोमो चांगलाच चर्चेत आला आहे. त्यासोबतच सतीश कौशिक, अनिल कपूर आणि अनुपम खेर यांच्यातील मैत्रीचे अनेक किस्सेदेखील या मंचावर प्रेक्षकांना ऐकायला मिळाले.