प्रियांका चोप्रा, अभिषेक बच्चन, जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेला ‘दोस्ताना’ २०१० मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच गाजला. विशेष म्हणजे बिचवर चित्रित करण्यात आलेल्या जॉनच्या एका सीनची सर्वाधिक चर्चा झाली. आता लवकरच या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. मात्र या चित्रपटात प्रियांका, जॉन आणि अभिषेक हे त्रिकुट मात्र पाहायला मिळणार नाही.

या महिन्यात चित्रपटाची स्क्रिप्ट फायनल करण्यात येणार आहे. तर पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी करण जोहर करत आहे. मात्र सिक्वलमध्ये नव्या कलाकारांना स्थान देण्याचा निर्णय करणनं घेतला आहे. त्यामुळे सिक्वलमध्ये प्रियांका, जॉन आणि अभिषेक यांच्यातला धम्माल ‘दोस्ताना’ मात्र पाहायला मिळणार नाही. यावर प्रतिक्रिया देताना जॉन म्हणाला या चित्रपटाचा मी भाग नाही,  याचं मला जास्त दु:ख वाटतं आहे. मात्र जॉननं करणला पुढील चित्रपटासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

करणच्या निर्णयावर अनेकांनी नापसंती दर्शवली आहे. सिक्वलमध्येही प्रियांका, जॉन, अभिषेक हेच त्रिकुट आम्हाला पाहायचं आहे अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत, त्यामुळे करण आता जुन्याच स्टारकास्टला प्राधान्य देतो की आणखी नव्या कलाकरांना संधी देतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.