News Flash

‘हिरोइन’ सिनेमात मी न्यूड सीन दिला, कारण…

'हिरोईन'मधील करीनाची भूमिका विशेष गाजली

करीना कपूर

करीना कपूर हे नाव कलाविश्वासाठी नवीन नाही. ‘रेफ्युजी’ या चित्रपटातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं. करीनाने आजवरच्या कारकीर्दीमध्ये बऱ्याच आव्हानात्मक भूमिकाही स्वीकारल्या आहेत. ‘चमेली’ आणि ‘हिरोईन’ या चित्रपटामध्ये तिने दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. विशेष म्हणजे ‘हिरोईन’ या चित्रपटामध्ये करीनाने एक न्यूड सीन दिला होता. या सीनची बरीच चर्चांही रंगली होती. मात्र हा चित्रपट करीनासाठी खास असून तिने न्यूड सीन का दिले यामागचं कारण नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.

मधूर भांडारकर दिग्दर्शित ‘हिरोईन’ या चित्रपटामध्ये करीना मुख्य भूमिकेत झळकली होती. यापूर्वी ती ‘चमेली’ या चित्रपटात वेगळ्या अंदाजात झळकली होती. मात्र ‘चमेली’पेक्षा ‘हिरोईन’मधील तिची भूमिका जास्त गाजली.

”हिरोईन’ या चित्रपटासाठी मी प्रचंड मेहनत घेतली होती. मी माझे शंभर नाही तर हजार टक्के योगदान दिलं होतं. इतकंच नाही तर एक न्यूड सीनही दिला होता. मात्र हे सारं मी मनापासून आणि एका खास कारणासाठी केलं होतं. या चित्रपटाच्या माध्यमातून मला माझ्या अभिनयाची एक नवीन बाजू प्रेक्षकांसमोर उलगडायची होती. त्यामुळेच मी न्यूड सीन देण्यास तयार झाले. कोणत्याही चित्रपटाची निवड करण्यापूर्वी मी फार विचार करते. माझ्या चाहत्यांना, प्रेक्षकाना मला कोणत्या भूमिकेत पाहायला आवडले याचा मी कायमच विचार करते”, असं करीनाने सांगितलं.

वाचा : Holi 2020 : ‘या’ गाण्यांशिवाय होळीचा रंग आहे फिका!

पुढे ती म्हणते, “मधूर एक उत्तम डायरेक्टर आहे. तो कायमच कलाकारांना त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना आव्हानात्मक भूमिका स्वीकारण्यासाठी भाग पाडतो. त्याने कंगना आणि प्रियांका या अभिनेत्रींनादेखील त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढलं आहे. त्याच्यामुळेच या अभिनेत्रींच्या अभिनयाची एक नवीन बाजू प्रेक्षकांना पाहता आली”.

दरम्यान, करीना अलिकडेच ‘गुड न्यूज’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात अक्षय कुमार, दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणी यांनी स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटाव्यतिरिक्त ती लवकरच ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटातही झळकणार आहे. तसंच ती करण जोहरच्या ‘तख्त’ या चित्रपटातही दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 11:21 am

Web Title: kareena kapoor khan talks about the nude scene in film heroine in an interview ssj 93
Next Stories
1 ‘हा’ आहे बॉलिवूडचा सर्वांत महागडा अभिनेता; एका जाहिरातीसाठी घेतो इतके कोटी रुपये मानधन
2 अक्षय कुमारनं करून दाखवलं; जिथून हाकलण्यात आलं तिथंच घेतलं घर
3 Holi 2020 : ‘या’ गाण्यांशिवाय होळीचा रंग आहे फिका!
Just Now!
X