10 July 2020

News Flash

‘ब्रेकअप के बाद’ १३ वर्षांनी करिना म्हणते, “शाहिद आणि माझ्यात…”

ब्रेकअप झाल्यानंतर १३ वर्षांनी करिनाने पहिल्यांदाच केला खुलासा

सैफ, करिना आणि शाहिद

अभिनेत्री करिना कपूर आणि शाहिद कपूर हे एकेकाळचं बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेतील जोडपं होतं. हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या. या दोघांनाही अप्रत्यक्षपणे ते मान्यही केलं होतं. याच काळात प्रदर्शित झालेला या दोघांचा ‘जब वी मेट’ चित्रपटही प्रचंड गाजला. या दोघांच्या केमेस्ट्रीचे सर्वांनी कौतुक केलं. मात्र अचानक या दोघांचं असं काही फिस्कटलं की हे दोघे एकमेकांशी बोलायचेही बंद झाले. दरम्याच्या काळात करिनाने अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं. त्यानंतर काही वर्षांनी शाहिदने मीरा राजपूतशी लग्न केलं. हे दोघेही सध्या आपआपल्या संसारात सुखी आहेत. मात्र नुकत्याच करिनाने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शाहिदशी ब्रेकअप झाल्यानंतर १३ वर्षांनी यासंदर्भात पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केलं आहे.

…म्हणून ‘जब वी मेट’ चित्रपट केला

करिना आणि शाहिद इम्तियाज अलीच्या ‘जब वी मेट’मध्ये एकत्र झळकले. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये या चित्रपटाबद्दल बोलताना ती म्हणते, “शाहिदनेच मला या चित्रपटाची स्क्रीप्ट वाचून काम करण्याचा सल्ला दिला होता. या चित्रपटामधील मुलीची भूमिका तुला छान करता येईल असं त्याने मला सांगितलं होतं.”

ब्रेकअप झालं अन्…

शाहिदबरोबरच्या ब्रेकअपसंदर्भात प्रश्न विचारला असता त्यावरही करिनाने दिलखुलासपणे उत्तर दिलं. ‘प्रत्येकाच्या नशिबाचे स्वतःचे असे वेगळे काही प्लान असतात. त्यानुसारच तुमचं आयुष्य पुढे सरकतं. ‘जब वी मेट’ आणि ‘टशन’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान आमच्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या. आमच्या तिघांच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडल्या. या गोष्टींचा आमच्या आयुष्यावर परिणाम झाला. या गोष्टींमुळे माझं तर आयुष्यच बदलून गेलं. त्यानंतर माझे आणि शाहिदचे रस्ते वेगळे झाले कारण दोघांनाही वेगळ्या मार्गांवर जायचं होतं,’ असं करिना म्हणाली.

माझं आयुष्य गीतसारखं…

माझं आयुष्य हे ‘जब वी मेट’मधील गीत या व्यक्तीरेखेसारखे असल्याचंही करिना या मुलाखतीमध्ये म्हणाली. “जब वी मेट आणि टशनच्या चित्रिकरणादम्यान घडलेल्या घटनांमुळे माझ्या खासगी आणि प्रोफेश्नल लाइफवर मोठा परिणाम झाला. गीतचे आयुष्य चित्रपटाच्या उत्तरार्धामध्ये बदलल्याचे दिसते तसंच माझ्याबरोबर झालं,” असं मत करिनाने व्यक्त केलं.

टशन स्वीकारला कारण…

‘टशन’ चित्रपटाबद्दल बोलताना करिना म्हणते, “या चित्रपटामुळे माझं करियर बदलेलं अस मला वाटलं होतं. मात्र झालं उलटं जब वी मेटमुळे माझ्या करियरला फायदा झाला. टशनमुळे माझं खासगी आयुष्य बदललं.” या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान पहिल्यांदा सैफ आणि करिना एकमेकांच्या जवळ आले, नंतर प्रेमात पडले आणि लग्नाच्या बेडीत अडकले. टशन चित्रपटासाठी करिनाने भरपूर वजन कमी करुन ती ‘साईज झिरो’ झाली होती. त्यावेळी तिच्या या लूकची चांगलीच चर्चा झाली होती.

करिना आणि सैफने २०१२ साली लग्न केले. त्यानंतर २०१६ साली त्यांना मुलगा झाला. तर दुसरीकडे २०१५ साली शाहिदने मीरा राजपूतशी लग्न केलं. शाहिद आणि मीराला दोन मुले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2020 12:00 pm

Web Title: kareena kapoor opens up about breakup with shahid kapoor during jab we met scsg 91
Next Stories
1 वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर वक्तव्यावर स्वरा भास्कर म्हणाली…
2 कियाराचा टॉपलेस फोटो वादाच्या भोवऱ्यात; डब्बू रत्नानीवर संकल्पना चोरीचा आरोप
3 कियाराचा टॉपलेस फोटो वादाच्या भोवऱ्यात; डब्बू रत्नानीवर संकल्पना चोरीचा आरोप
Just Now!
X