News Flash

Video : कार्तिक-साराचा किसिंग व्हिडिओ लीक

'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये साराने कार्तिकसोबत डेटवर जाण्याची इच्छा केली होती व्यक्त

कार्तिक-सारा

‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये जेव्हा अभिनेत्री सारा अली खानने कार्तिक आर्यनसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हापासून कार्तिक-साराचं नावं अनेकदा जोडलं गेलं आहे. रणवीर सिंगने पुढाकार घेत या दोघांची पहिली भेट घडवून आणली होती आणि आता आगामी ‘लव्ह आज कल २’ या चित्रपटात कार्तिक-सारा एकत्र काम करत आहेत. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहतेसुद्धा उत्सुक आहेत. पण त्यापूर्वीच दोघांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. तो चर्चेत असण्यामागचं कारणंही तसंच आहे. कारण कार्तिक-सारा एकमेकांना किस करतानाचा हा व्हिडिओ लीक झाला आहे.

किसिंग सीनचा हा व्हिडिओ ‘लव्ह आज कल २’च्या सेटवरचा आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट दीपिका पदुकोण आणि सैफ अली खानच्या ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाचा सिक्वल असल्याचं म्हटलं जात आहे. २००९ साली प्रदर्शित झालेला ‘लव्ह आज कल’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर हिट ठरला होता.

वाचा : नागराज म्हणतो, उत्तर माहित असेल तर मिस्ड कॉल द्या आणि करोडपती व्हा!

‘जब वी मेट’, ‘लव्ह आज कल’, ‘तमाशा’ यांसारख्या अनोख्या प्रेमकहाणींसाठी, चित्रपटांसाठी इम्तियाज प्रसिद्ध आहे. या चित्रपटात सारा आणि कार्तिकसोबतच अभिनेता रणदीप हुडासुद्धा भूमिका साकारत आहे. पंजाब आणि दिल्लीत याची शूटिंग पार पडणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 12:41 pm

Web Title: kartik aaryan and sara ali khan share a passionate kiss in this leaked video
Next Stories
1 सूडबुद्धीने पेटून उठलेली ‘मॅलेफिसन्ट’ परत येतेय
2 नागराज म्हणतोय, ‘उत्तर माहित असेल तर मिस्ड कॉल द्या आणि करोडपती व्हा!’
3 प्रत्येक ट्विटला क्रमांक देण्याविषयी बिग बी म्हणतात…
Just Now!
X