News Flash

…म्हणून कार्तिकनं नाकारली १० कोटींची ऑफर

'सोनू के टीटू की स्वीटी' च्या यशानंतर कार्तिकला १० कोटींची ऑफर एका चित्रपटासाठी देण्यात आली होती.

‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ यांसारख्या चित्रपटातून तरुणांच्या मनावर राज्य करणाऱ्या कार्तिकनं १० कोटींची ऑफर नाकारली आहे. ‘सोनू के टीटू की स्वीटी’ च्या यशानंतर कार्तिकला १० कोटींची ऑफर एका चित्रपटासाठी देण्यात आली होती. मात्र पैशांपेक्षाही भूमिका महत्त्वाची आहे असं सांगत कार्तिकनं चित्रपटाला नकार दिला आहे.

अनन्या पांडे आणि सारा अली खान या दोन अभिनेत्रींमुळे कार्तिक गेल्या काही दिवसांपासून चर्तेत आहे. कार्तिक अनन्या पांडेला डेट करत आहे अशा चर्चा बॉलिवूडमध्ये आहेत तर दुसरीकडे सारा अली खानला कार्तिकसोबत डेटवर जायचं आहे. आठवड्याभरापूर्वी कर्तिकनं ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमादरम्यान त्यानं स्वत: बद्दल अनेक न उलगडलेल्या गोष्टी सांगितल्या. सध्या तो ‘लुका छुपी’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यानं १० कोटींची ऑफर नाकारल्याचं मान्य केलं.

‘सोनू के टीटू की स्वीटी’ च्या यशानंतर मला एका मनोरंजन कंपनीनं १० कोटींची ऑफर दिली होती. पण काही केल्या ती भूमिका माझ्या मनाला पटत नव्हती. पैसे महत्त्वाचे आहेत पण जर भूमिकाच पटत नसेल तर काम का करावं? असं माझं मन मला सांगत होतं त्यामुळे मी चित्रपटाची ऑफर नाकारली असं कार्तिक म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 11:44 am

Web Title: kartik aaryan was offered rs 10 crore but he turned it down
Next Stories
1 Photo : ‘सांड की आँख’ मध्ये पुन्हा एकदा प्रकाश झा यांचा अभिनय
2 ‘या’ वेबसीरिजमधून करिश्मा करणार कमबॅक
3 थोडी तरी लाज बाळग, हनीमूनचे फोटो शेअर केल्यामुळे सौंदर्या ट्रोल
Just Now!
X