News Flash

कतरिनाची हीरोपंती, वाचवला कॅमेरामॅनचा जीव

त्या कॅमेरामॅनचा जीव थोडक्यात वाचला

सोनम कपूरचा द झोया फॅक्टर हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान अभिनेत्री कतरिना कैफने एका कॅमेरामॅनचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे.

कतरिना कैफ द झोया फॅक्टरच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी गेली होती. त्यावेळी कतरिनाला भेटण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. या गर्दीतून बाहेर पडण्यासाठी अभिनेता अर्जुन कपूर कतरिनाला मदत करत होता. हा संपूर्ण गोंधळ एक कॅमेरामॅन आपल्या कॅमेरात कैद करत असताना अचानक मागून एक गाडी आली. ही गाडी कॅमेरामॅनला ठोकणारच होती, तेवढ्यात कतरिनाने त्याला आवाज दिला व त्या गाडीपासून दूर जाण्याचा इशारा दिला. कतरिनाचा आवाज ऐकून तो कॅमेरामॅन सावध झाला. परिणामी त्याचा जीव थोडक्यात वाचला. घडलेला प्रकार पाहून सर्वांनीच कतरिनाचे कौतूक केले.

हा व्हिडीओ व्हायरल होत आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 5:00 pm

Web Title: katrina kaif arjun kapoor the zoya factor mppg 94
Next Stories
1 Movie Review: कुटुंबातील राजकीय संघर्षाची कथा ‘प्रस्थानम’
2 ‘फक्त बायकोच नाही, तर तिचा पुतळा सुद्धा सेक्सी’ – रणवीर सिंग
3 ‘कभी अलविदा ना…’मधील शाहरुखचा तो मुलगा १३ वर्षानंतर असा दिसतो, पाहून थक्क व्हाल