28 February 2021

News Flash

कतरिनाच्या आयुष्यात आला नवा तरुण; पडली पुन्हा एकदा प्रेमात?

दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ सध्या जोरदार चर्चेत आहेत. दोघांना अनेकदा एकत्र फिरताना पाहिले गेले आहे. तसेच त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परिणामी ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांचा उधाण आले. यावर पहिल्यांदाच विक्की कौशल प्रतिक्रिया दिली आहे. “प्रेम ही जगातील सर्वोत्तम भावना आहे.” असं म्हणत विकीने कतरिनाला डेट करत असल्याचे अप्रत्यक्षरित्या मान्य केले.

काय म्हणाला विकी कौशल?

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या विकीने अलिकडेच डेक्कन क्रॉनिकलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला कतरिनासोबतच्या रिलेशनशिपबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर विकी म्हणाला, “मला कतरिनाबाबत स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. पण मी एवढं सांगतो की, मी कधीही माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कुणालाही खोटं सांगत नाही. प्रेम ही जगातील सर्वोत्तम भावना आहे. आणि सध्या मी त्याचा अनुभव घेत आहे.” असं म्हणत विकीने प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने दोघांच्या रिलेशनशिपबाबत नकार देखील दिला नाही.

विकी कौशल येत्या काळात भूत पार्ट वन: द हॉन्टेड शिप हा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्तानेच ही मुलाखत घेण्यात आली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन भानू प्रताप सिंग करत आहेत. येत्या २१ फ्रेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 3:40 pm

Web Title: katrina kaif new boyfriend vicky kaushal mppg 94
Next Stories
1 कसाबला फासापर्यंत पोहोचवणाऱ्या उज्ज्वल निकम यांच्यावर येणार बायोपिक
2 आशिकी फेम राहुल रॉय अद्याप बॅचलर; कारण ऐकून व्हाल थक्क
3 Video : नीना गुप्ता सलमानला मारणार प्रेमाची मिठी!
Just Now!
X