News Flash

कतरिना-रणबीरने ‘ऑटो एक्स्पो’मध्ये एकमेकांना भेटणे टाळले!

कतरिना कैफ आणि रणबीर कपूर हे दोघेही बुधवारी दिल्लीतील ‘ऑटो एक्स्पो शो’ च्या उद्घटनास उपस्थिस होते.

कतरिना-रणबीर

पूर्वाश्रमीचे प्रियकर असलेले कतरिना कैफ आणि रणबीर कपूर हे दोघेही बुधवारी  दिल्लीतील ‘ऑटो एक्स्पो शो’ च्या उद्घटनास उपस्थिस होते. मात्र, दोघांचीही भेट होणार नाही याची काळजी व्यवस्थापकांनी बाळगलेली पाहायला मिळाली. काही दिवसांपुर्वीच कतरिना-रणबीरच्या ब्रेकपच्या चर्चा वृत्तपत्रे आणि चॅनेलमधून रंगल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या व्यवस्थापकांनी दिल्लीतील ‘ऑटो एक्स्पो शो’मध्ये हे दोघे एकाच वेळी एकत्र येणार नाही याची खबरदारी घेऊन या दोघांच्या ब्रेकअपच्या वृत्तावर जणू शिक्कामोर्तब केले.

‘हिरो मोटोकॉर्प’ च्या एका नवीन बाईकचे अनावरण करण्यासाठी रणबीर कपूर सकाळी ११ वाजता ‘ऑटो एक्स्पो’ दाखल झाला. पण त्याने एका तासात कार्यक्रम संपवून तेथून काढता पाय घेतला. दरम्यान, रणबीर निघून गेल्यानंतर पूर्वाश्रमीची प्रेयसी कतरिना ‘जग्वार एक्सई’ च्या अनावरणासाठी दाखल झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2016 4:37 pm

Web Title: katrina kaif ranbir kapoor avoid bumping into each other at auto expo in delhi
Next Stories
1 शाहरुख आणि आमीरच्या मनात भीती- सोनम कपूर
2 ‘कपूर अँड सन्स’ चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित
3 सोनाक्षीचे ऑस्ट्रेलियात स्कूबा डायव्हिंग
Just Now!
X