मनोरंजनासोबतच माहितीचा स्त्रोत म्हणून पहिला जाणारा ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो कायमच चर्चेत असतो. शोचे सूत्रसंचालक बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन तसेच शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक हे प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करतात. त्याचबरोबर अनेक स्पर्धक आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर लाखो करोडो रुपये जिंकताना दिसतात. अशाच एका स्पर्धकाने १९ वर्षांपूर्वी १ कोटी रुपयांची रक्कम ज्यूनिअर केबीसीमध्ये जिंकली होती. पण आता हा स्पर्धक काय करत असेल असा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला जाणून घेऊया…

२००१ मध्ये कौन बनेगा करोडपती ज्यूनिअरमध्ये १४ वर्षांच्या मुलाने बुद्धिमत्तेच्या जोरावर १ कोटी रुपये जिंकले होते. या मुलाचे नाव रवि मोहन असे होते. आता हाच रवि मोहन सैनी पोरबंदर येथे एसपी म्हणून कार्यरत आहे. २०१४मध्ये तो आयपीएस अधिकारी झाला. त्यानंतर आता तो एसपी म्हणून काम काम करत आहे.

कौन बनेगा करोड पती ज्यूनिअरमध्ये रविने अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या १५ प्रश्नांची योग्य उत्तरे देत एक कोटी रुपये जिंकले होते. आज त्याचे वय ३३ वर्षे आहे. डॉ. रवि मोहन सैनी पोरबंदर येथे एसपी म्हणून कार्यकरत आहे. यापूर्वी तो राजकोट येथे डीसीपी होता. २०१४ मध्ये रविने UPSC परिक्षा देऊन तो गुजरातचा आयपीएस अधिकारी झाला होता. रविचे वडिल नौसेनेमध्ये होते. रविने एमबीबीएस पर्यंत शिक्षण घेतले आहे.