27 February 2021

News Flash

‘बिग बॉसच्या घरात फिक्सिंग होतंय’; कविता कौशिकचा आरोप

'इथे सर्व काही आधिच निश्चित केलं आहे'; कविता कौशिकने 'बिग बॉस'वर केले फिक्सिंगचे आरोप

‘बिग बॉस’च्या १४ व्या सिझनला मोठ्या धुमधड्यात सुरुवात झाली आहे. हा रिअॅलिटी शो सुरु होऊन आता चार आठवडे उलटून गेले आहेत. परिणामी या शोमधील सर्व स्पर्धक घरात टिकून राहण्यासाठी एकमेंकांविरोधात जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र या सर्व स्पर्धकांमध्ये अभिनेत्री कविता कौशिक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. कारण ‘बिग बॉस’वर तिने चक्क फिक्सिंगचे आरोप केले आहेत. बिग बॉसच्या घरात कुठला स्पर्धक जिंकणार हे निर्मात्यांनी आधिच निश्चित केलं आहे असा खळबळजनक आरोप तिने केला आहे.

अवश्य पाहा – KBC मुळे अमिताभ झाले करोडपती; एका एपिसोडचं मानधन पाहून व्हाल थक्क

अवश्य पाहा – Halloween Night 2020: हे चित्रपट कधीही लहान मुलांसोबत पाहू नका

या शोमध्ये कविता आणि एजाज खान या दोन स्पर्धकांमध्ये जोरदार भांडण झालं. त्यावेळी तिने एजाजवर संताप व्यक्त करताना बिग बॉसवर देखील आरोप केले. “मी एजाजला सतत संभाळून घेतलं. त्याच्यासाठी जेवण केलं. परंतु बिग बॉसने यापैकी काहीच दाखवलं नाही. माझी चांगली बाजू त्यांनी दाखवली नाही. बिग बॉसने केवळ निक्की तांबोळीला जिंकवावं. एजाजला आणि पवित्राला पाठिंबा द्यावा. इथे सर्व काही आधिच फिक्स झालेलं दिसतंय. मला इथे आता राहण्याची इच्छा उरलेली नाही.” असं म्हणत तिने आपला संताप व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2020 1:08 pm

Web Title: kavita kaushik bigg boss 14 mppg 94
Next Stories
1 ‘या राजकीय व्यक्तीचा स्वॅग पाहा’; स्वराने शेअर केलेला व्हिडीओ होतोय व्हायरल
2 Video : ‘लक्ष्मीकांत बेर्डेंची जागा घेणं कोणाला शक्य नाही’
3 अभिनेत्री अमृता रावच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन
Just Now!
X