सर्व सामान्यांची अनेक स्वप्न असतात, त्या कोटयाधीश होण्याचं स्वप्न अनेकांनी पाहिलं असेल. सामान्यांच्या याच स्वप्नांना पखांचं बळ देण्यासाठी ‘कौन बनेगा करोडपती’ हा रिअॅलिटी शो सुरु करण्यात आला. आतापर्यंत या शोमध्ये अनेकांनी कोटयवधी रुपये जिंकत त्यांची स्वप्न पूर्ण केली आहेत. मात्र, यंदाच्या पर्वात एका स्पर्धकाचं हे स्वप्न अपूर्णच राहिल्यांच दिसून येतं. केवळ १ हजार रुपयांच्या प्रश्नासाठी या स्पर्धकाला लाइफलाइनचा आधार घ्यावा लागला.

पवनगढी येथील हेमलता यांनी अलिकडेच ‘केबीसी १२’ च्या मंचावर हजेरी लावली होती. मात्र, पहिल्याच प्रश्नामध्ये त्यांना लाइफलाइनचा आधार घ्यावा लागला. हेमलता यांना चमच्यांसदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, या प्रश्नाचं योग्य उत्तर ठावूक नसल्यामुळे त्यांनी लाइफलाइन वापरावी लागली.

आणखी वाचा- KBC 12 : ही महिला IPS अधिकारी ठरली दुसरी करोडपती; जाणून घ्या तिच्याविषयी…

”यापैकी चमच्याचा प्रकार कोणता?” असा प्रश्न हेमलता यांना विचारण्यात आला होता. त्यासाठी त्यांना “A. चेयर, B. टेबल, C. बेड, D. कपबोर्ड”. हे चार पर्याय देण्यात आले होते. मात्र, प्रश्नाचं योग्य उत्तर माहित नसल्यामुळे हेमलता यांनी लाइफलाइनचा वापर केला. यावेळी त्यांनी ‘फ्लिप द क्वेश्चन’ ही लाइफलाइन निवडली आणि प्रश्न बदलून घेतला. हा दुसरा प्रश्न हिंदू पौरााणिक कथेशी निगडीत होता. विशेष म्हणजे त्याचं योग्य उत्तर हेमलता यांनी दिलं.

दरम्यान, हेमलता यांच्यापूर्वी अंकुश शर्माने २५ लाख रुपये जिंकले होते. अंकुश शर्मा हे केबीसी १२ मध्ये येणारे पहिले दिव्यांग व्यक्ती होते. विशेष म्हणजे त्यांची गेम खेळण्याची पद्धत आणि बुद्धिमत्ता पाहून बिग बीदेखील आश्चर्यचकित झाल्याचं पाहायला मिळालं.