News Flash

५० लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर चुकले, स्पर्धकाला हरताना पाहून अमिताभ बच्चन देखील झाले दु:खी

या प्रश्नाचे तुम्ही देऊ शकाल का उत्तर?

माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ या शोचे सूत्रसंचालन बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन करत आहे. या शोच्या माध्यमातून चाहत्यांना अमिताभ यांना भेटण्याची संधी मिळते. नुकताच या शोमध्ये एका स्पर्धकाने ५० लाख रुपयांच्या प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिल्यामुळे खेळ सोडावा लागला आहे.

फास्टेस्ट फिंगर फर्स्टमध्ये विचारलेल्या प्रश्नाचे वेगाने उत्तर देत सौरभ कुमार साहू हे हॉटसीटवर बसले होते. ते उत्तर प्रदेशमधील बदायूं येथील आहेत. बुद्धीमत्तेच्या जोरावर त्यांनी २५ लाख रुपयांच्या प्रश्नापर्यंतच्या प्रश्नांची योग्य उत्तर दिली. दरम्यान त्यांच्या सगळ्या लाइफलाइन संपल्या. ५० लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिल्यामुळे त्यांना ३ लाख रुपये घेऊन गेम सोडवा लागला होता. पण तुम्ही या ५० लाख रुपयांच्या प्रश्नाचे योग्य उत्तर देऊ शकता का?

५० लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न-

भारतात सर्वात जास्त वर्ष राज्यपालपदी राहण्याचा विक्रम कुणाच्या नावे आहे?
A. स्वराज कौशल
B. एनएन व्होरा
C. एम एम जॅकव
D. सुरजित सिंह बर्नाला

थोडा वेळ विचार करुन सौरभ यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले. त्यांनी D. सुरजित सिंह बर्नाला हा पर्याय निवडला. पण हे उत्तर चुकीचे असल्याचे अमिताभ यांनी म्हटले. या प्रश्नाचे योग्य उत्तर C. एम एम जॅकव असे आहे. सौरभला हरताना पाहून अमिताभ बच्चन हे दु:खी झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 1:35 pm

Web Title: kbc 12 saurabh kumar sahu loss game on 50 lakh rupees question avb 95
Next Stories
1 कॅमेराला हिंदीत काय म्हणतात? शाहरुखच्या प्रश्नावर ऐश्वर्याची गुगली
2 ‘अमराठी व्यक्तीसाठी मराठी भय्ये नेते का बोंबलतायेत?’; महेश टिळेकर यांचा सवाल
3 “…तर आज ही वेळ आली नसती”; अलका कुबल यांच्या आरोपांवर बोलताना प्राजक्ताला अश्रू अनावर
Just Now!
X