जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांमुळे मृत्यू झाला. या दुदैवी घटनेचा संबंध अमेरिकेतील वर्णद्वेषाशी जोडला जात आहे. परिणामी वर्णद्वेषाविरोधात आंदोलन उभे राहिले आहे. कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी सुरु असलेल्या या आंदोलनाला ‘ब्लॅक लिव्ह्स मॅटर’ असं नाव देण्यात आलं आहे. या आंदोलनात अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी भाग घेतला आहे. दरम्यान सुपरमॉडेल केंडल जेनर हिने देखील आंदोलनाला पाठिंबा दिला. मात्र ती फोटो शॉपच्या मदतीने आंदोलनात सहभागी होती का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारण्यास सुरुवात केली आहे.

‘ब्लॅक लिव्ह्स मॅटर’ हे पोस्टर हातात घेऊन उभी राहिलेल्या केंडरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष? आंदोलनात भाग घेतलाय मग पोस्टबाजी तर करणारचं. पण या प्रकरणातील चकित करणारी बाब केंडल उन्हान उभी आहे. परिणामी जमिनीवर तिची सावली दिसतेय. पण तिच्या सावलीच्या हातात पोस्टरसारखी आकृती मात्र दिसत नाही. त्यामुळे फोटोशॉपच्या मदतीने तिने आंदोलनात भाग घेतला होता का? असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रकरणी तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आलं.

या प्रकरणावर केंडलने देखील प्रतिक्रिया दिली आहे. “असा कुठलाही फोटो मी पोस्ट केलेला नाही. हा फोटोशॉपच्या मदतीने एडिट केलेला फोटो दिसतोय.” अशा आशयाचे ट्विट तिने केले आहे. आता कोण खरं बोलतयं अन् कोण खोटं हे सध्या तरी सांगणं कठीण आहे. मात्र या दोन्ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.