दुबईहून १९१ प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला केरळमध्ये अपघात झाला आहे. केरळमधील कोझिकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरल्याने हा भीषण अपघात झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली जात आहे. यात चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांनीदेखील त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कोझिकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडलेल्या या मुंबईतील वैमानिकासह १७ जणांचा मृत्यू, तर १२३ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामुळे केदार शिंदे यांनी त्यांच्या भावना व्यक्त करत या वर्षात नेमकं काय घडतंय असा प्रश्न विचारत खंत व्यक्त केली आहे.

“२०२० मॅच आपल्या आयुष्यासोबत सुरू आहे की काय? असं वाटू लागलय. कधी संपतंय हे वर्ष असं झालंय!!! #AirIndiaCrash #2020worstyear #2020mood”, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, २०२० या वर्षात अनेक दुर्दैवी घटना घडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात नेमकं काय सुरु आहे असा प्रश्न सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींनाही पडल्याचं दिसून येत आहे.