News Flash

शाहरुखच्या मुलासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार खुशी कपूर

श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशीसुद्धा अभिनयात करिअर करणार असल्याची चर्चा आहे.

खुशी कपूर, आर्यन खान

चित्रपटसृष्टीतील बऱ्याच कलाकारांची मुलं करिअरच्या दृष्टीने या क्षेत्राकडे पाहतात. किंबहुना काहींनी तर आपल्या आई- वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत या क्षेत्राची वाटही धरली आहे. अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर हिचं बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण झालं. ‘धडक’ या चित्रपटातून तिने करिअरला सुरुवात केली. आता श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशीसुद्धा अभिनयात करिअर करणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे खुशीच्या लाँचची जबाबदारीसुद्धा निर्माता- दिग्दर्शक करण जोहरनेच घेतल्याची माहिती आहे.

‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या वृत्तानुसार, करण जोहर खुशीसाठी योग्य पटकथेची निवड करत आहे. विशेष म्हणजे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबत खुशी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं कळतंय. आर्यनसुद्धा त्याच्या पदार्पणासाठी जोरदार तयारी करत आहे.

Photo : नटश्रेष्ठ काशिनाथ घाणेकर यांच्या भूमिकेतील सुबोध भावेचा फर्स्ट लूक

खुशी आणि आर्यन ही नवीन जोडी स्क्रिनवर पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील. सोशल मीडियावर खुशीच्या चाहत्यांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत असल्याचं लक्षात येत आहे. कलाविश्वातील नावाजलेल्या कुटुंबातील खुशी आता तिच्या या पदार्पणाला कशा प्रकारे सार्थ ठरवते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 1:46 pm

Web Title: khushi kapoor to be launched opposite shah rukh khan son aryan
Next Stories
1 ‘बिग बीं’बरोबर केलेल्या तुलनेविषयी अभिषेक म्हणतो..
2 PHOTOS : असा पार पडला ‘जय मल्हार’ फेम सुरभी हांडेचा साखरपुडा
3 मुंबईतील ‘त्या’ चौकाला दिले दिवंगत अभिनेते प्राण यांचे नाव
Just Now!
X