News Flash

के एल राहुलचा मलायकावर होता क्रश पण..

के एल राहुलने उलगडलं हार्दिक पांड्याचं गुपित

के एल राहुल, मलायका अरोरा

‘कॉफी विथ करण’ या बहुचर्चित चॅट शोचा यंदाचा सिझन चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये सेलिब्रिटींच्या त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच घडामोडींचा उलगडा होतो. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटीच्या बारीकसारिक गोष्टी जाणून घ्यायला मिळतात. यंदाच्या सिझनमध्ये करण जोहरने पहिल्यांदाच क्रिकेट क्षेत्रातील दोन व्यक्तींना बोलावलं. हे दोन व्यक्ती म्हणजे हार्दिक पांड्या आणि के एल राहुल. वैयक्तिक अनुभवांपासून ते बॉलिवूड क्रशपर्यंत बऱ्याच गोष्टी दोघांनी शोमध्ये सांगितल्या.

के. एल. राहुल आणि हार्दिक यांच्या एपिसोडचा प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. करण जोहरच्या प्रश्नांवर एकमेकांची मस्करी करताना आणि एकमेकांचं गुपित मजेशीर पद्धतीने सांगताना हे दोघं दिसत आहेत. यावेळी के एल राहुलने बॉलिवूडमधल्या त्याच्या क्रशबद्दलही सांगितलं. ‘अभिनेत्री मलायका अरोरावर माझा क्रश होता पण अर्जुन कपूर आणि मलायका यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्यापासून तो संपला,’ अशी प्रांजळ कबुली के एल राहुलने शोमध्ये दिली.

वाचा : ‘या’ बायोपिकमध्ये दीप-वीर ऑनस्क्रीन पती-पत्नीच्या भूमिकेत?

हार्दिक पांड्या एकच मेसेज वेगवेगळ्या मुलींना पाठवायचा आणि दोघी-तिघींनी तर त्याचे स्क्रिनशॉट मलासुद्धा पाठवले होते, असं गुपित के एल राहुलने उलगडलं. इतकंच नव्हे तर चीअरलीडर्समुळे कोणाचं लक्ष विचलित होतं असा प्रश्न विचारला त्यावर के एल राहुलने हार्दिकची टेर खेचली. ‘हार्दिक सतत चीअरलीडर्ससोबत असतो, त्यामुळे मॅचमध्ये असताना त्याचं लक्ष कसं विचलित होईल,’ असं तो म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2019 11:13 am

Web Title: kl rahul reveals he had crush on malaika arora before she dated arjun kapoor on koffee with karan 6
Next Stories
1 शॉर्ट्स घातल्याने आमिर खानची मुलगी इरा ट्रोल, फतवा काढण्याची युजर्सची मागणी
2 ‘या’ बायोपिकमध्ये दीप-वीर ऑनस्क्रीन पती-पत्नीच्या भूमिकेत?
3 ‘ग्रीन बुक’ला सर्वाधिक ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार
Just Now!
X